Bus travel expensive in belgaum 
पश्चिम महाराष्ट्र

ब्रेकिंग ; बसप्रवास महागला ; लांब पल्ल्याच्या दरात मोठी वाढ 

सकाळ वृत्तसेवा

बेळगाव - वायव्य परिवहन मंडळाने बस तिकीट दरात वाढ केली असून गुरुवारी (ता. 26) सकाळपासून त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. मंडळाने जरी 12 टक्के दरवाढ केली असली तरी शहर व ग्रामीण भागातील बस तिकीट दरात तफावत असून प्रतिस्टेज सरासरी 1 रुपयाप्रमाणे वाढ केली आहे. मात्र, पुणे, मुंबई, कोल्हापूर, बंगळूर प्रवासाचा दर वाढला आहे. गेल्या सहा वर्षांत मंडळाने दरवाढ केली नव्हती. मात्र, शासनाने अचानक निर्णय घेत बसदर वाढविले आहेत. 

शेवटची बस तिकीट दरवाढ 2014 मध्ये झाली होती. त्यानंतर डिझेल दरात वाढ होऊनही बसप्रवास महागला नव्हता. गतवर्षी कॉंग्रेस-धजद युती सरकारने तिकीट दरात वाढ केली होती. मात्र, दुसऱ्याच दिवशी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी ही दरवाढ रद्द केली होती. त्यामुळे, दरवाढ थांबली होती. परिवहन मंडळांचा प्रस्ताव तसेच सहा वर्षांत दरवाढ न झाल्याचा विचार करुन अखेर दरवाढीचा निर्णय घेतला आहे. मात्र डिझेल दरवाढ आणि कर्मचाऱ्यांचे वाढलेले वेतन यामुळे परिवहन मंडळ आर्थिक नुकसानीत आहे. त्यामुळे, सरकारला दरवाढ करावी लागली आहे. 

शहर व ग्रामीण भागातील बस तिकीट दरात सरासरी 1 ते 2 रुपयांची वाढ केली आहे. पहिल्या स्टेजचा दर बदललेला नाही. त्यामुळे, पहिल्या तीन किलोमीटरसाठी 5 रुपये आकारणी होणार आहे. सीबीटीपासून कोर्ट, गांधीनगर अशा ठिकाणी पहिल्या स्टेजचे दर 5 रुपयेच राहतील. मात्र, त्यापुढील स्टेजसाठी थेट 2 रुपयांची वाढ केली आहे. सीबीटीपासून रेक्‍स, आरएलएस, धर्मवीर संभाजी चौकापर्यंतचा जुना दर 8 रुपये होता. त्यात दोन रुपये वाढ होणार असून 10 रुपये मोजावे लागतील. 

शहर,  ग्रामीण भागातील नवे दर 
स्टेज         प्रौढ      लहान मुले 
1              5         3 
2              10       5 
3              12       6 
4               14       7 
5               15        8 
6               16         8 
7               17         9 
8 ते 10        18        9 
11 ते 13       19       10 
14 ते 17       20       10 
18 ते 20       21        11 


लांब पल्ल्यांसाठी नवे दर 
शहर                 दर 
कोल्हापूर          139 
पुणे                411 ते 466 
मुंबई               716 ते 871 
म्हैसूर               558 
बंगळूर            564 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nandigram Bypoll : नंदीग्राम पोटनिवडणुकीआधी मोठी घडामोड; काँग्रेस उमेदवार मिलन प्रधान यांच्यानंतर पक्षातील बड्या नेत्यालाही अटक

Pune University Mess Fee Hike: पुणे विद्यापीठातील मेस दरवाढीचा भार विद्यार्थ्यांवर नको; विद्यापीठाने अनुदान द्यावे: ‘विद्यार्थी संघर्ष कृती समिती’ची मागणी

Chhatrapati Sambhajinagar crime control: दहशत माजवणाऱ्या संदिप फटाकडेला छ. संभाजीनगर जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार

Marathi News Live Updates : बुलढाण्यात कंटेनर-दुचाकीचा भीषण अपघात; मायलेकाचा जागीच मृत्यू

Sugarcane Mechanization: ऊसतोड मजुरांच्या मनमानीला कंटाळून शेतकऱ्यांचा यंत्रांकडे मोर्चा; आधुनिक हार्वेस्टरमुळे वेळ व खर्चात बचत

SCROLL FOR NEXT