अमरापूर : मुळा धरणाच्या उजव्या कालव्यातून सुरू असलेल्या आवर्तनाचे पाणी "टेल'च्या शेतकऱ्यांपर्यंत पोचू नये, यासाठी भातकुडगाव व तेलकुडगाव येथील काही शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना हाताशी धरून, जेसीबीच्या साह्याने भराव टाकून चारी बंद केली आहे. त्यामुळे आवर्तन अंतिम टप्प्यात असताना भातकुडगाव शाखा कालव्यांतर्गत 11 गावांतील एक हजार हेक्टर क्षेत्रावरील पिके जळून जाण्याची भीती व्यक्त होत आहे.
उन्हाळी पिकासाठी मुळा धरणाचे आवर्तन 20 मार्चपासून सुरू आहे. एक महिन्याचा कालावधी उलटला, तरी सामनगाव, लोळेगाव, जोहरापूर, मळेगाव, खामगाव, हिंगणगाव, गुंफा, आखतवाडे, भातकुडगाव या भागातील पाणीवापर संस्थांना व शेतकऱ्यांना पाणी मिळालेले नाही. सतरा पाणीवापर संस्थांनी आठ लाख रुपये पाणीपट्टी भरून पाणीमागणी केलेल्या एक हजार 800 हेक्टरपैकी "टेल'चे एक हजार हेक्टरहून अधिक क्षेत्र पाण्यापासून वंचित आहे.
हेही वाचा - भाजपचा आमदार जयकुमार गोरेंना वाटतेय भिती
भातकुडगावच्या वरच्या भागातील शेतकऱ्यांनी पुढे "टेल'ला जाणारी चारी जेसीबीच्या साह्याने भराव टाकून बंद केली आहे. त्यातून तेथील व वरील भागातील पिकांचे एकाच आवर्तनातून तीन वेळा भरणे झाले आहे. मात्र, "टेल'च्या आठ संस्थांना पैसे भरूनही पाणी मिळालेले नाही. त्यामुळे भुईमूग, कांदा, ऊस, चारापिके जळून खाक झाली आहेत. "टेल टू हेड' हा भरण्याचा नियम डावलून पाटबंधारे विभागाचे अधिकारी केवळ "वरचे शेतकरी ऐकत नाहीत, कर्मचारी व बंदोबस्त पुरेसा नाही' असे सांगून जबाबदारी झटकत आहेत.
आर्थिक हितसंबंध जोपासण्यासाठी "हेड' विरुद्ध "टेल' असा संघर्ष शेतकऱ्यांमध्ये पेटवून देण्याचाही प्रयत्न होत आहे. गस्तीवर कर्मचारी नसल्याने देडगाव ते भातकुडगाव या 15-20 किलोमीटरच्या वितरिकेत अनधिकृत वीजपंप, पाइप टाकून, चारी फोडून दंडेलशाही करत सर्रासपणे पाणी उचलले जात असल्याने खालचे शेतकरी मात्र हताशपणे पाण्याची वाट पाहत आहेत.
पाण्यापासून वंचित संस्था व क्षेत्र
स्वामी समर्थ (सामनगाव-लोळेगाव)- 350हेक्टर
हनुमान (आखतवाडे)- 200 हेक्टर
ज्ञानेश्वर (भातकुडगाव)- 140 हेक्टर
जिजामाता (जोहरापूर)- 130 हेक्टर
त्रिमूर्ती (भातकुडगाव)- 100 हेक्टर
हरिप्रसाद (खामगाव-हिंगणगाव)- 15 हेक्टर
हरितक्रांती (जोहरापूर)- 65 हेक्टर
किसानक्रांती (जोहरापूर)- 7 हेक्टर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.