पश्चिम महाराष्ट्र

सातारा : 'या' 15 एटीएममधून 25 लाखांवर डल्ला

सकाळ वृत्तसेवा

सातारा : शहरातील विविध 15 एटीएममध्ये तांत्रिक बिघाड करून 24 लाख 81 हजार रुपये काढल्याप्रकरणी चार अनोळखी व्यक्तींवर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
 
स्टेट बॅंक ऑफ इंडियाचे व्यवस्थापक संजय तुकाराम गव्हाळे (रा. गोलबागेजवळ, राजवाडा) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. 26 जानेवारी ते दोन मार्च या कालावधीत हे पैसे काढले गेल्याचे त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे. संशयित एटीएम कार्डचा वापर करून पिन क्रमांक व रक्कम टाकायचे त्यानंतर पैसे बाहेर येण्यापूर्वीच ते पैसे ज्या ठिकाणावरून येतात ती सेन्सरची पट्टी उचलून धरत होते. त्यामुळे एटीएममध्ये तांत्रिक बिघाड होऊन जादा रक्कम बाहेर येत होती. अशाप्रकारे वरील कालावधीत त्यांनी अहिरे कॉलनी, औद्योगिक वसाहत, बारावकरनगर, समर्थ मंदिर, गुरुवार पेठ, सदरबझार, नगरपालिका, गोडोली, शाहूनगर व शाहूपुरी परिसरातील एटीएममधून सुमारे 24 लाख 81 हजार रुपये काढले. याबाबत माहिती मिळाल्यानंतर गव्हाळे यांनी याबाबत फिर्याद नोंदविली. 

रंगपंचमी कार्यक्रमावर कारवाई 

सातारा : गोडोली परिसरातील एका हॉटेलमध्ये विनापरवाना सुरू असलेल्या रंगपंचमीच्या कार्यक्रमावर सहायक पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी कारवाई केली आहे. गोडोली परिसरातील रितेश मोरे यांच्या हॉटेल ग्रिन सॅण्डमध्ये हा कार्यक्रम सुरू होता. तेथे शुभम चौकवाले, प्रणाल लादे, सूरज जाधव, ओंकार मोहिते, अमोल गोखले (सर्व रा. मंगळवार पेठ) यांनी बेकायदेशीरपणे धुणटाक या रंगपंचमच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. तेथे रजनी नागे हे डीजे म्हणून होते. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर सहायक पोलिस अधीक्षक समीर शेख व त्यांच्या पथकाने तेथे कारवाई केली. या वेळी ध्वनिक्षेपक यंत्रणा, एलईडी व अन्य साहित्य जप्त करण्यात आले.

लग्न करताय पोलिसांची एनओसी घ्या अन्यथा...

सातारा : कोरोना संसर्ग होऊ नये म्हणून लोक ‘मास्क’ व ‘सॅनिटायझर’ वापरण्यासाठी औषध विक्रेत्यांकडे धाव धेत आहेत. त्याचा गैरफायदा घेवून विक्रेते काळाजाबर करत आहेत, असे राज्यात विविध भागात आढळून आले आहे. सातारा जिल्ह्यात असे आढळून आल्यास संबंधित विक्रेत्यावर गुन्हा दाखल करुन त्याचे दुकान सील करण्यात येईल. त्यामुळे कोणत्याही औषध विक्रेत्याने काळाबाजार करुन नये, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे.

जिल्हाधिकारी साहेब एकदा जेवायला याच हाे..!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation: मनाेज जरांगेंचा मोठा निर्णय? १८व्या दिवशी मुंबईकडे निघण्याची तयारी; उपोषणस्थळी समर्थकांची गर्दी

Saundatti Dharwad Road Accident : बेळगावसाठी काळा दिवस! १५ तासांत ७ जणांचा मृत्यू; सौदत्ती-धारवाड मार्गावर भीषण अपघातात तीन मित्र जागीच ठार

Mumbai-Goa Highway Chemical Leak : मुंबई-गोवा महामार्गावर पुगाव हद्दीत ज्वलनशील रसायन वाहून नेणाऱ्या कंटेनरला अपघात; सर्व यंत्रणांच्या सतर्कतेमुळे गणेशोत्सवातील भीषण दुर्घटना टळली

Latest Marathi News Update : कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही...: राज ठाकरेंच्या टीकेचा रोष कोणाकडे

टीम इंडियाने करंडक जिंकला, नक्वींच्या हातून ट्रॉफीही घेतली नाही; आता ACC अध्यक्षांच्या खुर्चीवर टांगती तलवार, पुन्हा निवड होणार का?

SCROLL FOR NEXT