पश्चिम महाराष्ट्र

ब्रेकिंग : यात्रा समितीवर राज्यात पहिला गुन्हा दाखल 

सकाळ वृत्तसेवा

सातारा ः बावधन (ता. वाई) येथे शुक्रवारी (ता. 13) भैरवनाथ यात्रे निमित्त बगाड मिरवणुक संपन्न झाली. कोरोना व्हारयसच्या पार्श्‍वभुमीवर संसर्ग रोखण्याचे अनुषंगाने प्रशासनाकडून केल्या जात असलेल्या उपाययोजनामध्ये अडथळा निर्माण केल्याने यात्रा समितीचे अध्यक्षांसह चार जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. मंडलधिकारी सचिन शिवाजीराव जाधव यांनी वाई पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल केला आहे. 
"काशिनाथाच्या नावानं चांगभलं'च्या गजरात बावधन (ता. वाई) येथील ग्रामदैवत भैरवनाथाच्या बगाडाची मिरवणूक शुक्रवारी (ता.13) हजारो भाविकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात व शांततेत पार पडली. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने यात्रेवर प्रतिबंध घातल्याने बगाड पाहण्यासाठी येणाऱ्यांची संख्या घटली होती. त्याचा परिणाम गर्दीवर झाल्याचे दिसून आले. बंदोबस्तावरील पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सुरक्षिततेसाठी तोंडावर मास्क लावला होता.
 
बावधनच्या पूर्वेस सुमारे पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या कृष्णा तीरावरील सोनेश्वर येथून सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास बगाड मिरवणुकीस प्रारंभ झाला. त्यापूर्वी बगाड्यास नदीत स्नान घालून देवदेवतांची विधिवत पूजा-आरती करण्यात आली. त्यानंतर बगाड्यास पारंपरिक पोशाख घालून बगाडाच्या झोपाळ्यावर चढविण्यात आले. या वेळी भाविकांनी नोटांची व नारळाची तोरणे, झेंडे, गोंडे बगाडाच्या शिडाला बांधले. बगाड म्हणजे दोन मोठी चाके असलेला रथ. या रथावर सुमारे 30 ते 40 फुटांच्या उंचीच्या शिडावर झोपाळ्याच्या साह्याने बगाड्यास चढविण्यात येते. यावर्षी हा मान मनोज नायकवडी (वय 33) यांना मिळाला. एका वेळी दहा ते बारा बैलजोड्यांच्या साह्याने हा रथ ओढण्यात येत होता. ठराविक अंतरावर बैल बदलण्यात येत होते. त्यासाठी शेकडो बैल शिवारातून उभे दिसत होते. बगाड रथाच्या मागे वाघजाईदेवी, भैरवनाथ आणि ज्योतिबाची पालखी सुशोभित करून ठेवण्यात आली होती. त्याचे भाविक दर्शन घेत होते. काही ठिकाणी बगाड थांबवून विश्रांती घेण्यात येत होती. या वेळी पाच फेऱ्या घालण्यात येत होत्या. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून दर वर्षीप्रमाणे यात्रा नियोजन समिती नेमली होती. या समितीतील सदस्य बगाडाच्या पुढे व मागे ध्वनिक्षेपकावरून मार्गदर्शन व सूचना करीत होते. भाविकांच्या सोयीसाठी विविध व्यक्ती व सामाजिक संस्थांनी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली होती. प्राथमिक आरोग्य केंद्राचे पथक तैनात करण्यात आले होते.
 
दुपारी दोनच्या सुमारास बगाड, वाई-सातारा रस्त्यावर आले. या वेळी काही काळ वाहतूक बंद करण्यात आली. त्यानंतर दुपारी चार वाजता बगाड गावात मंदिराजवळ पोचले. तेव्हा वाद्यांचा गजर करण्यात आला. मिरवणुकीच्या मार्गावर आइसस्क्रीम व शीतपेयांच्या हातगाड्या उभ्या होत्या. हॉटेल व मिठाई व्यावसायिक, खेळणीवाले, शीतपेयांची विक्री करणाऱ्या फेरीवाल्यांनी दुकाने थाटली होती.

वाचा : सातारा : या 15 एटीएममधून 25 लाखांवर डल्ला

हेही वाचा : पालिकेच्या कारवाईतून वाचविण्यासाठी त्यांनी मागितले 80 लाख 

दर वर्षी बगाड पाहण्यासाठी रस्त्यांच्या दुतर्फा हजारोंच्या संख्येने भाविक गर्दी करतात. दिवसभरात जिल्हा व राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक बगाड पाहण्यासाठी आवर्जून येतात. यावर्षी मात्र कोरोना व्हायरसमुळे बगाड पाहणाऱ्या भाविकांची गर्दी कमी होती. परिसरातील वाडीवस्तीवरील ग्रामस्थ, त्यांचे पै-पाहुणे व नागरिक मिरवणुकीत उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. 

कुस्त्यांचे मैदान, तमाशा रद्द 

यात्रेवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिस उपअधीक्षक अजित टिके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक आनंदराव खोबरे, सहायक पोलिस निरीक्षक अशिष कांबळे, पोलिस उपनिरीक्षक संजय मोतेकर, राजेंद्र कदम यांच्यासह 50 पोलिस कर्मचारी, राखीव पोलिस दलाची तुकडी, महिला व वाहतूक पोलिस, होमगार्ड बंदोबस्तासाठी तैनात ठेवण्यात आले होते. बगाड मिरवणूक शांततेत पार पडली. प्रशासनाच्या आदेशानुसार कुस्त्यांचे मैदान व तमाशाचा कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती यात्रा समितीच्या सदस्यांनी दिली.

नक्की वाचा : गड किल्ल्यांवर जाण्यापुर्वी हे करा

यात्रा समितीवर गुन्हा दाखल

वाई पाेलिसांता यात्रा समितीवर गुन्हा दाखल झाला. गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये यात्रा समितीचे अध्यक्ष राजेंद्र आबाजी भोसले, उपाध्यक्ष दिपक दिलीप ननावरे, सचिव अंकूश जग्न्नाथ कुंभार, खजिनदार सचिन आप्पासाहेब भोसले, सदस्य संभाजी शिवाजी दाभाडे यांचा समावेश आहे. या सर्वांवर भारतीय दंड संहिता 1860 अन्वय कलम 188 आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 अन्वय कलम 135 नूसार गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान संबंधित समितीने जिल्हाधिकारी यांनी कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर काढलेल्या आदेशाचा भंग केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd Test: बुमराहशी जो नडला, त्याला आम्ही गाडला! शुभमन गिल अन् झॅक क्रॉली यांच्यात बाचाबाची, काय घडलं? Video

IND vs ENG 3rd Test: भारताकडे '०' धावांची आघाडी; ११ धावांत गमावले ४ बळी, कसोटीत असे केव्हा घडले अन् निकाल काय लागला होता?

Sanjay Gaikwad Imtiaz Jaleel Clash: ‘’तुला तर असं मारेन..असं मारेन की, परत तू...’’ ; संजय गायकवाडांनी आता इम्तियाज जलील यांना भरला दम!

'मला भारताकडून पुन्हा कसोटी क्रिकेट खेळायचे आहे'; अजिंक्य रहाणेची मन की बात! इंग्लंडमधून निवड समितीला पाठवला मॅसेज

IND vs ENG 3rd Test: भारताने ५० वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला! रवींद्र जडेजा थेट गॅरी सोबर्स यांच्या पंक्तीत बसला, जगात दोघंच खेळाडू असे करू शकलेत

SCROLL FOR NEXT