पश्चिम महाराष्ट्र

कऱ्हाडला दहा जणांसह ट्रकही ताब्यात

सकाळ वृत्तसेवा

कऱ्हाड ः कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जमावबंदी व संचारबंदी लागू आहे. अशातही ट्रकमधून 10 जण प्रवेश करत असल्याप्रकरणी रात्री मालखेड फाटा येथे कारवाई करण्यात आली. संबंधितांवर त्याप्रकरणी गुन्हा दाखल करून ट्रकही ताब्यात घेण्यात आला आहे. हवालदार आशिष पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संबंधितांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती तालुका पोलिसांनी दिली.
 
पोलिसांची माहिती अशी ः मालखेड फाटा येथे नाकाबंदी सुरू आहे. तेथे हवालदार पाटील, पोलिस उपनिरीक्षक अशोक भापकर व अन्य सहकारी कार्यरत आहेत. नाकाबंदी सुरू असताना ट्रक (केए 14 सी 0197) घेऊन चालक आला आहे. त्याच्याकडे विचारपूस केल्यावर समाधानकारक उत्तर देता आले नाही. त्यानंतर ट्रकची तपासणी केल्यावर त्यामध्ये आणखी दहा जण असल्याचे आढळले. त्यावरून संबंधितावर जिल्हाधिकाऱ्यांच्या संचारबंदी व जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

त्यामध्ये ए. एन. मल्लेश (वय-38, रा. कोहाली, कर्नाटक) या चालकासह देवराज गौडा (60, रा. वाशी), सुनील बी. पी (26, रा. रामगिरी, कर्नाटक), हरीष गौडा व राधचंद्रा नागेश गौडा (रा.मुलुंड-मुंबई), नवीनकुमार लख्खेगौडा (27, रा. कोळीवाडा, मुंबई), योगेश जवेरेगौडा (32, रा. प्रतीक्षानगर-मुंबई), सागर सुरेश गौडा (17, कोपरखैरणे), सोमनाथ मणजेगौडा, ललिता सोमनाथ गौडा (रा. नवी मुंबई), जयलक्ष्मी जवेरे गौडा (50, रा. प्रतीक्षानगर-मुंबई) यांचा समावेश आहे. 

हेही वाचा - क्षणात काॅन्स्टेबलच्या डोळ्यासमोरून स्वजीवनाचा फ्लॅशबॅक सरकला 


जरुर वाचा  कोरोनाशी फाईट देताना 64 वर्षीय सातारा जिल्ह्यातील कराड येथील डॉ. शितल कुलकर्णी यांना आपले वयाचेही भान राहत नाही. इतकी ऊर्जा घेवून त्या स्वतः काम करतात. त्याशिवाय आरोग्य सेविका अन्‌ आशा स्वंयसेविकांनाही काम करण्याची प्ररेणा देतात. कशा पद्धतीने त्यांचे कार्य सुरु आहे घेऊया जाणून

नक्की वाचा  लॉकडाउनच्या कालावधीमध्ये मधुमेह रुग्णांनी कशा पद्धतीने काळजी घ्यावी जेणेकरुन रक्तातील साखर नियंत्रणात राहील, वजन वाढणार नाही, प्रतिकार शक्ती चांगली राहील याबाबतची माहिती जाणून घेऊ.

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Spain Crisis : हे झॉम्बी नाहीत तर माणसं... फोटो हादरवणारे! समुद्रातून पोहत लोक स्पेनमध्ये का पोहोचले? मोरोक्कोतून का उडाली झुंबड?

Afroz Jhari Disqualified : महाविकास आघाडीला मोठा धक्का! काँग्रेस नगरसेविका अफरोज झारींचे सदस्यत्व रद्द; महायुतीची पकड मजबूत होणार?

Gorakhpur Murder Case : चिमुकल्या वैभवच्या हत्येप्रकरणी आरोपीचे कुटुंबिय अटकेत, घरावर चालणार बुलडोझर; फॉरेंसिक टीम करणार 'सीन रीक्रिएट'

Maharashtra Flood News: पहिल्याच पावसात कंधार-नरसी मार्ग पाण्यात; बांधकाम विभागाविरोधात ग्रामस्थ करणार जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात ठिय्या आंदोलन

उपमुख्यमंत्र्यांसह मंत्र्याच्या घरी आणि कार्यालयात पेपर बंद, खर्च कमी करण्यासाठी सरकारचा मोठा निर्णय; वृत्तपत्र विक्रेत्यांचा विरोध

SCROLL FOR NEXT