Pandharpur-Kartiki-Wari
Pandharpur-Kartiki-Wari 
पश्चिम महाराष्ट्र

कार्तिकी वारीसाठी पंढरपूरला जाताय; असं आहे रेल्वेचं वेळापत्रक

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : पंढरीच्या पांडुरंगाची कार्तिकी वारी येत्या शुक्रवारी (ता. 8) असून यानिमित्त महाराष्ट्रासह परराज्यातून भाविक पंढरपूरमध्ये दाखल होतात. त्यांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाद्वारे नियोजन करण्यात आले आहे. 7 ते 9 नोव्हेंबरपर्यंत सहा रेल्वे गाड्यांची व्यवस्था करण्यात आली असून त्यामध्ये मिरज-पंढरपूर, पंढरपूर-मिरज, पुणे-पंढरपूर, पंढरपूर-पुणे, लातूर-पंढरपूर, पंढरपूर लातूर या गाड्यांचा समावेश आहे.

पुणे-पंढरपूर विशेष गाडी पुण्याहून पहाटे 4.25 वाजता सुटणार असून उरळी कांचन, केडगाव, दौंड, भिगवण, जेऊर, कुर्डूवाडी, मोडनिंबमार्गे सकाळी 10.30 वाजता पंढरपुरला पोहोचणार आहे. या गाडीला 16 डबे असणार आहेत. पंढरपूर-पुणे ही गाडी सायंकाळी 5.25 वाजता पंढरपुरातून सुटणार असून रात्री 10 वाजता पुण्यात पोहोचणार आहे. तर पंढरपूर-मिरज-पंढरपूर ही रेल्वे पंढरपूर स्थानकावरून सकाळी 10.50 वाजता सुटणार असून सांगोला, म्हसोबा डोंगरगाव, जत रोड, ढालगाव, कवठेमहांकाळ, सलगरे, अरगमार्गे मिरजला दुपारी 1.30 वाजता पोचणार आहे. 

मिरज- पंढरपूर रेल्वे गाडी दुपारी 1.50 वाजता मिरजहून निघणार असून पंढरपुरात सांयकाळी 5.10 वाजता पोहोचणार आहे. पंढरपूर -मिरज गाडी पंढरपूरहून पहाटे 5.30 वाजता सुटणार असून या गाडीला 20 डबे असणार आहेत. तर ती गाडी मिरजहून सकाळी 9.40 वाजता सुटणार असून दुपारी 1.30 वाजता पंढरपूरला पोहचणार आहे. पंढरपूर- मिरज विशेष गाडी पंढरपूरहून दुपारी 2.30 वाजता सुटेल आणि सायंकाळी 5.30 वाजता मिरजला पोहचेल. ती रेल्वे मिरजहून संध्याकाळी 7 वाजता सुटेल आणि रात्री 10.30 वाजता पंढरपूरला पोहचणार आहे.

पुणे-पंढरपूर-पुणे ही रेल्वे पुण्याहून सकाळी 6.35 वाजता सुटेल आणि उरळी, केडगाव, दौण्ड, बोरिबेल, मलटण, भिगवन, जिंती रोड, रावडी, वाशिंबे, पोपळज, जेऊर, भाळवणी, केम, ढवळस, कुर्डूवाडी, मोडनिंबमार्गे पंढरपुरला दुपारी 12.55 वाजता पोहचेल. ती गाडी पंढरपूर स्थानकावरून दुपारी 3.00 वाजता सुटेल आणि रात्री 9.30 वाजता पुण्याला पोहचेल. लातूर-पंढरपूर ही 18 डब्यांची विशेष रेल्वे 6 ते 8 नोव्हेंबरदरम्यान धावणार असून लातूर स्थानकावरून सकाळी 7.45 वाजता सुटेल आणि हरंगुळ, औसा रोड, ढोके, येडशी, उस्मानाबाद, पांगरी, बार्शी टाउन, शेंद्री, कुर्डूवाडी, मोडनिंबमार्गे सकाळी 11.30 वाजता पंढरपुरला पोहचेल. ती गाडी पंढरपूर स्थानकावरून दुपारी 2 वाजता सुटेल आणि सायंकाळी 6.15 वाजता लातूर स्थानकावर पोहचणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT