Chhatrapati Shivaji Maharaj statues agitations in jat sangli marathi news 
पश्चिम महाराष्ट्र

शिव प्रेमींना करावे लागले प्रतीकात्मक आंदोलन..

सकाळ वृत्तसेवा

जत (सांगली) :  जत शहरामध्ये सांगली रोडवरील शिवाजी चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा गेल्या चौदा वर्षापासून बसविणे प्रलंबित आहे. चबुतरा बांधून चार ते पाच वर्षे झाली. तालुक्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी ही याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे हा पुतळा तातडीने बसविण्यात यावा, या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते विक्रम ढोणे यांनी लक्षवेधी आंदोलन केले. 
 सामाजिक कार्यकर्ते ढोणे यांनी मंगळवारी दि. 18 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता येथील शिवाजी पेठेत आज बुधवारी होणार्‍या शिव जयंतीला तालुक्यातील तमाम शिवभंक्तांचे लक्ष वेधले. या आंदोलनाची सांगता ही छत्रपती शिवाजी महाराज यांचा विचार आजच्या पिढीला समजावा म्हणून "शिवाजी कोण होता" व "शिवरायांचा आठवावा सापेक्ष" ही पुस्तक वाटून करण्यात आला. या अनोख्या उपक्रमाच्या माध्यमातून हे आंदोलन चांगलेच चर्चेत राहिले.

उपस्थिती

 सामाजिक कार्यकर्ते विक्रम ढोणे यांनी केलेल्या लक्षवेधी आंदोलनास संभाजी ब्रिगेडचे जिल्हा कार्याध्यक्ष श्रेयस नाईक, सुधीर चव्हाण, श्रीकृष्ण पाटील, मच्छिंद्र बाबर, सिद्धू  गायकवाड, ओबीसी तालुकाध्यक्ष राजू मुल्ला, शफीक इनामदार, युवा सेनेचे बंटी दुधाळ, धैर्यशील संकपाळ,अनिकेत सरगर,विलास सरगर , रासप तालुकाध्यक्ष किसन टेंगले,स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष सुरेश घागरे ,  शिवाजी गडदे , शंकर वगरे अनिसचे रवी संगोलकर, युवराज जाधव , विलास काळे , शंकर पारेकर, भुपेंद्र कांबळे,गौतम ऐवळे,राहुल शिंदे ,संतोष माळी, प्रमोद ऐवळे आदींनी पाठींबा दिला.

प्रतीकात्मक आंदोलन
यावेळी सर्वांना गोविंद पानसरे लिखित "शिवाजी कोण होता " आणि शिवरायांचा आठवावा साक्षेप या पुस्तकाच्या प्रती भेट देऊन शिवाजी महाराजांचा विचारांचा प्रसार करून प्रतीकात्मक आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाची तालुकाभर चर्चा सुरू झाली आहे, अनेक शिव प्रेमींनी आता तातडीने पुतळा उभा करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मनोज जरांगेंच्या भूमिकेवर मंत्रिमंडळात नाराजीचा सूर; बैठकीनंतर अधिकाऱ्यांना बाहेर जाण्यास सांगण्यात आलं अन्...; नेमकं काय घडलं?

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील मुंबई दौरा रद्द करणार? प्रकृतीवर परिणाम; पुढचा निर्णयही सांगितला

शाळेतल्या मित्राने PM मोदींची भेट घेतली, आता भाजप आमदाराने मित्राच्या मुंबईतील जमिनीवरचा ताबा सोडला

Marathi News Live Updates : मुंबईत मालिका रुग्णालयात गॅस गळतीने स्फोट, दोघे होरपळले

पाकिस्तानातील कराचीत गणपती बाप्पा मोरयाचा गजर! मराठी कुटुंबाकडून साजरा केला जातो गणेशोत्सव, आरतीचा VIDEO VIRAL

SCROLL FOR NEXT