केळघर (जि. सातारा) : आज (मंगळवार) सकाळी वाळंजवाडी गावात धुलिवंदनची धामधूम असताना अचानक नीलगायचा दोन वर्षाचा बछडा कुत्र्यांच्या तावडीत सापडला. त्यामुळे तो वाळंजवाडी गावात शिरला आणि पळून जात असताना गावच्या शिवकालीन तळ्यात पडला. ही बातमी गावात पसरली असता धुळवडीचा सण, होळी शिंपन्याचा सण बाजूला सारुन गावातील महिला अबालवृध्द सगळे तळ्याकाठी जमले. आपआपल्या परीने या पिल्लाला वाचवणेचा प्रयत्न करू लागले.
मेढा वनक्षेत्रपाल यांची तुकडी व शिवरक्षक व महाबळेश्वर ट्रेकर्स यांना फोन केला. परंतु संबंधितांना यायला वेळ लागेल हे पाहून वाळंजवाडी ग्रामस्थ तसेच सेवेला नेहमी तत्पर असलेले, केळघरचे नाना जांभळे, सागर पार्टे हे घटनास्थळी पोहचले. पाण्यात पोहून दमलेल्या बछड्याला काढण्यासाठी उपसरपंच लक्ष्मण पाडळे, नाना जांभळे, बळवंत पाडळे,प्रदिप पाटील,रोहीत पाडळे, नितीन देसाई यांनी जिवाची पर्वा न करता तळ्यात उड्या मारल्या. पिल्लाला तळ्या किनारी काढले. तळ्यातील खडकावर विसावल्या नंतर हळूहळू बछडा तळ्यातून वर आला आणि उडी मारून जंगलात निघून गेला.
याकामी वाळंजवाडी ग्रामस्थ ,वनक्षेत्रपाल आर. एस. परदेशी,वनपाल श्री.परधाने , श्री., मर्ढेकर यानी सहकार्य केले. मीरा कुटे- सोडमिसे वनरक्षक केळघर विभाग,यांनीही मेढ्याहून मोटारसायकलवर प्रवास करत असतानाही मोबाईल वरून बछड्याला कसे वाचवता येईल याबाबत आपण कोणती काळजी घ्यावी याचे मार्गदर्शन करत होत्या. तसेच सातारहून वनक्षेत्र भरारी पथक अधिकारी सचिन डोंबाळे यांनी ग्रामस्थांना फोनवरून सुचना देत मदत केली. वनविभागाच्या अधिकारी वर्गाने गावात येऊन ग्रामस्थांचे अभिनंदन केले. ऐन धुळवडीच्या दिवशी दुर्मिळ अशा निलगायच्या बछड्याला जीवदान दिल्याने ग्रामस्थांचे कौतुक करण्यात येत आहे. हा बछडा वनविभागाने नंतर वनहद्दीत सुरक्षितपणे सोडून दिला.
वाचा : कात्रज नवीन बोगद्याजवळ असलेल्या डोंगरावरील झाडांना रविवारी सायंकाळी अचानक आग लागली. वाचा पुढं नेमकं काय घडलं.
हेही वाचा : शाळांपुढे कोरोना संबंधी हा यक्ष प्रश्न ?
जरुर वाचा : Video : तगमग वीस तासांची; आता बाळ ठणठणीत
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.