Closing the old tradition of municipal contractors  
पश्चिम महाराष्ट्र

महापालिका ठेकेदारांचे जुने पायंडे बंद

अमित आवारी

नगर : महापालिकेच्या जिवावर ठेकेदार आहेत. ठेकेदारांच्या जिवावर महापालिका नाही. शहरातील कामे गुणवत्तापूर्ण झालीच पाहिजेत. निकृष्ट कामे करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल. महापालिकेतील ठेकेदारांचे जुने पायंडे बंद करण्याचा इशारा प्रभारी शहर अभियंता सुरेश इथापे यांनी ठेकेदारांना दिला. 

महापालिकेत आज बांधकाम विभागाच्या ठेकेदारांची आढावा बैठक इथापे यांनी घेतली. या वेळी शाखा अभियंता एम. एस. पारखे, शाखा अभियंता श्रीकांत निंबाळकर, ठेकेदार व कर्मचारी उपस्थित होते. या वेळी ठेकेदारांच्या अडीअडचणी इथापे यांनी जाणून घेतल्या. त्यानंतर त्यांनी ठेकेदारांशी संवाद साधला. तीन दिवसांपूर्वीच इथापे यांनी पदभार स्वीकारला आहे. पदभार स्वीकारताच त्यांनी महापालिका आवारात पार्किंगची जागा दुरुस्त करणे, कार्यालयीन पद्धतीत बदल अशा सुधारणा त्यांनी सुरू केल्या आहेत. 

इथापे म्हणाले, की महापालिकेतील बांधकाम विभागात विनाकारण ठेकेदार गर्दी करतात. फायली घेतात. बांधकाम विभागातील हे जुने पायंडे आता चालणार नाहीत. नगर शहर आपले आहे. शहरात बांधकाम विभागाच्या ठेकेदारांविषयी प्रतिमा मलिन आहे. ही प्रतिमा सुधारणे आवश्‍यक आहे. त्यासाठी सामाजिक दृष्टिकोन ठेवून काम करा. प्रस्तावाप्रमाणेच काम करा. काम निकृष्ट दर्जाचे झाल्यास बिलातील रक्‍कम कमी करणे, बिलाचे पैसे न देणे, ठेकेदारांना काळ्या यादीत टाकणे आदी कायदेशीर कारवाई करू, असे इथापे यांनी ठेकेदारांना बजावले. 

ठेकेदारांना महापालिकेत येण्याची वेळ 
बांधकाम विभागाचे ठेकेदार महापालिकेत नेहमीच दिसतात. घोळका करून थांबतात. बांधकाम विभागात जमावाने येतात. ठेकेदारांनी बांधकाम विभागात दुपारी 3 ते 5 या वेळेतच यावे. कामाव्यतिरिक्‍त थांबायचे नाही, अशी सूचना प्रभारी शहर अभियंता इथापे यांनी दिल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ऑनलाइन ग्रोसरी ऑर्डर करण्याआधी सावधान! Blinkit च्या फ्रीजरमध्ये जिवंत उंदीर आढळला; स्टोअरचा व्हिडिओ व्हायरल

पेपरमध्ये ढीगभर चुका, UGC-NET परीक्षेचे तीन पेपर पुन्हा होणार, तारीखही जाहीर...

Rohit Sharma: बाप रे बाप...! सायकलवरून हजारो किमीचा प्रवास करून आलेल्या फॅनला भेटल्यावर कशी होती रोहितची रिअ‍ॅक्शन, Viral Video

Phone Charging Tips: Airplane Mode ON करून फोन चार्ज केला तर काय होतं? जाणून घ्या

Shirur Bypass Crash: शिरूर बायपासवर पुन्हा बळी; तुटलेल्या दुभाजकातून दुचाकी नेणे जीवावर बेतले

SCROLL FOR NEXT