पश्चिम महाराष्ट्र

नागरिकांची पुनर्वसनाची तयारी असावी - CM ठाकरे

पुरस्थितीत लोकांचे किती नुकसान झाले याचा आढावा मी आज घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

स्नेहल कदम

सांगली (भिलवडी) : कायमस्वरुपी तोडग्यासाठी कठोर निर्णय घ्यावा लागेल, नागरिकांची पुनर्वसनाची तयारी आहे का? असा सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगलीतील भिलवडी नागरिकांना केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज, सांगली दौऱ्यावर आहेत. गेल्या आठवड्यात आलेल्या पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री सांगलीच्या दौऱ्यावर आले आहेत. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगलीकरांना धीर दिला.

सोमवारी सकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं कोल्हापूर विमावतळावर आगमन झालं. त्यानंतर ते मोटारीने सांगलीकडे रवाना झाले. भिलवडी येथे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, कोरानाचे संकट आहे. त्यामुळे शक्यतो गर्दी टाळा. पुरामुळे अनेकांचे नुकसान झाले आहे, घरे वाहून गेली आहेत. मात्र प्रशासन कुणालाही वाऱ्यावर सोडणार नाही असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले आहे. पुढे ते म्हणाले, नागरिकांनी पुनर्वसनाची तयारी करायला हवी. यादरम्यान काही वेळा कठोर निर्णय घ्यावे लागतील तेव्हा सर्वांनी सहकार्य करावे. आपण सर्व मिळून या संकटातून मार्ग काढूयात. या पुरस्थितीत सांगलीमध्ये जवळपास चार लाख नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. यात लोकांचे किती नुकसान झाले याचा आढावा घेणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

आपत्तीच्या काळात तुम्हाला पायावर उभे करायची जबाबदारी आहे. अतिवृष्टी होण्याअगोदरपासून या संपूर्ण भागात कोरोनाचा संसर्ग खूप मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. त्यामुळे कृपया गर्दी करू नका, मास्क घालत राहा. असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले आहे. पावसाळ्यानंतर येणारे आजार होणार नाहीत, यासाठी प्रशासनाला योग्य त्या सूचना दिल्या आहेत. सर्वांची निवेदने मी घेत आहे. उद्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत यावर चर्चा करू. पूर दरवर्षी येतो. मुख्यमंत्री, मंत्री दरवर्षी अशी पाहणी करणार, चौकशी करुन जाणार, असेच आयुष्य जगायचे का ? असा सवाल त्यांनी यावेळी अकंलखोपवासियांना केला आहे. अतिवृष्टीचा इशारा येताच या भागातील लोकांचे प्रशासनाने लगेच स्थलांतर केले आहे. जीव जाऊ दिले नाहीत. हे आपलं सरकार आहे. तुमची सर्वांची ताकद आहे. तुमच्या हिताचेच निर्णय घेणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. थोड्याच वेळात ते कसबे डीग्रज आणि मौजे डिग्रज येथे पोहचणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Drug Racket : पुण्यात एमडी ड्रग्ज विक्रीसाठी डिलिव्हरी अ‍ॅपचा वापर; मोठे रॅकेट उघड, चार जण अटकेत

Satara Politics: सातारा झेडपीची अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड रद्द करा;राष्ट्रवादीचे विभागीय आयुक्तांकडे अपील, जिल्हाधिकारी, एसपींबाबत तक्रार!

Yo Yo Honey Singh Pune show : यो यो हनी सिंगचा पुण्यातला शो होणार रद्द, थेट एसपींकडे तक्रार; गाण्यावर घेत आक्षेप

What is Anjaneri Ropeway Project? हनुमान भक्तांसाठी मोठी बातमी! सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी अंजनेरीला मिळणार नवं रूप; आता डोंगरावर चढण्याची कसरत संपणार!

NCP MLAs leaving party : राष्ट्रवादी काँग्रेसचे २५ ते ३० आमदार पक्ष सोडणार?, हसन मुश्रीफांनी एका वाक्यात कंडका पांडला

SCROLL FOR NEXT