ahilyadevi-holkar SOLAPUR UNIVERCITY 
पश्चिम महाराष्ट्र

धक्‍कादायक...स्वत:च्या चौकशीसाठी स्वत:च नेमली समिती

तात्या लांडगे
सोलापूर : स्वतःचा लॉगीन आयडी वापरुन फार्मसीच्या विद्यार्थ्याचे गुण वाढविण्यात पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ. मृणालिनी फडणवीस यांचा कोणताही हस्तक्षेप नसल्याचा खुलासा कुलसचिव डॉ. व्ही. बी. घुटे यांनी मंगळवारी (ता. 17) केला. सत्यशोधन समितीने हा अहवाल दिल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मात्र, स्वत:च्या चौकशीसाठी कुलगुरुंनी स्वत:च समिती नियुक्‍त केल्याने आर्श्‍चय व्यक्‍त होत आहे.

हेही वाचाच... नक्‍की वाचाच...अशी होणार 2021 ची जनगणना


स्वतःचा लॉगीन आयडी वापरून वि. गु. शिवदारे फार्मसी कॉलेजमधील अनुत्तीर्ण विद्यार्थ्याला उत्तीर्ण केल्याचा आरोप विद्यार्थी कॉंग्रेसने केला होता. यासंदर्भात विद्यापीठाने त्रिसदस्यीय सत्यशोधन समिती नियुक्‍ती करुन सखोल चौकशी केली. या समितीच्या चौकशीत लॉगिन आयडी व पासवर्ड तयार करण्याचे अधिकार एमकेसीएल, पुणे आणि विद्यापीठाचे यंत्रणा विश्‍लेषक पी. आर. चोरमले यांच्याकडे असल्याचे दिसून आले. तत्कालीन परीक्षा संचालक डॉ. श्रीकांत कोकरे यांच्या आदेशानुसार कुलगुरू यांच्या नावे एम.फडणवीस या नावाने लॉगीन आयडी तयार करण्यात आला होता. त्या पासवर्डसह एमकेसीएलने 15 जानेवारी 2019 रोजी ई-मेल केल्याचे आढळून आले आहे. यासंदर्भात कुलगुरू डॉ. फडणवीस यांना कोणतीच कल्पना नव्हती. त्यामुळे विद्यापीठातील परीक्षा विभागातील काही अधिकाऱ्यांनी कुलगुरु डॉ. फडणवीस यांना अंधारात ठेवून त्यांच्या नावे लॉगीन आयडी व पासवर्ड वापरल्याचे समोर आल्याचेही डॉ. घुटे यांनी सांगितले.


हेही वाचाच...छानच की...अपघात रोखण्यासाठी 'फोर-ई'चा उपाय


समितीचा ठपका...
- 'एम.फडणवीस'द्वारे जानेवारी 2019 व जून 2019 या महिन्यात पाच परीक्षा क्रमांकात बदल
- बदलावेळी कुलगुरू डॉ. फडणवीस या प्रवासात व विविध ठिकाणी कार्यालयीन बैठकांसाठी उपस्थित
- परीक्षा विभागातील काही अधिकाऱ्यांनी कुलगुरु यांना अंधारात ठेवून बेकायदेशीर काम केले
- विद्यापीठातील काही अधिकाऱ्यांनी कटकारस्थान रचून कुलगुरुंचा वापरला लॉगिन आयडी
- विद्यापीठाने अधिक चौकशी करून संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची गरज
- भविष्यात विद्यापीठाने संगणक कक्ष व सर्व खोलीत सीसीटीव्ही बसवून सुरक्षेच्या उपाययोजनांचा कराव्यात
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat Case : भोंदू अशोक खरातचा आणखी एक कारनामा ! शेतकऱ्याची जमीन हडपली, पोलिसांकडे तक्रार करताच सुपारी देऊन हत्या

Gopikishan Bajoria: पक्षाच्या वाढीसाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करावे: माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया; चार नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश!

Numerology : 'या' 3 मूलांकाच्या मुली असतात सर्वांत जास्त साध्याभोळ्या; साक्षात लक्ष्मीचे रूप बनून बदलतात जोडीदाराचे आयुष्य

Latest Marathi News Live Update : मुंबई गोवा महामार्गावर आंबा काजू बागायतदारांचे चक्काजाम आंदोलन

Pune Magarpatta Canal Burst : मगरपट्टा परिसरात कालवा फुटला; 2 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा, घराबाहेर पडण्यापूर्वी 'हे' पर्यायी मार्ग नक्की पाहून घ्या...

SCROLL FOR NEXT