खासगी शाळांना इमारत सुरक्षा 'एनओसी'ची सक्ती sakal
पश्चिम महाराष्ट्र

चिक्कोडी : खासगी शाळांना इमारत सुरक्षा 'एनओसी'ची सक्ती

शिक्षण खात्याचा आदेश : आर्थिक भुर्दंडाला संस्थाचालकांचा विरोध

सकाळ वृत्तसेवा

चिक्कोडी : खासगी आणि अनुदानित शाळांनी आपली इमारत सुस्थितीत व सुरक्षित असल्याबाबतचे 'ना हरकत प्रमाणपत्र' (एनओसी) सार्वजनिक बांधकाम विभागाकडून घ्यावे, असा आदेश शिक्षण खात्याने बजावला आहे. या आर्थिक भूर्दंडाला खासगी शाळा संस्था चालकांनी विरोध केला आहे. राज्यात सध्या अवकाळी पावसाचा धुमाकूळ सुरू आहे. त्यामुळे जीर्ण झालेल्या शाळा इमारती कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परिणामी विद्यार्थी व शिक्षकांच्या जीवाला धोका निर्माण होऊ नये, यासाठी इमारतीची सुरक्षा तपासणीचे काम सार्वजनिक शिक्षण खात्याच्या वतीने सुरू आहे. त्यानुसार खासगी आणि अनुदानित शाळांच्या जुन्या व नव्या इमारतींची तपासणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करून घ्यावी.

त्यासाठी एकूण इमारत मूल्याच्या 0.5 टक्के इतका शुल्क संबंधित कार्यकारी अभियंत्याकडे भरण्याची सूचना खासगी शाळांना करण्यात आली आहे. या आदेशाला खासगी शाळांनी विरोध दर्शवला आहे. कोविडमुळे खासगी शाळा आधीच आर्थिक संकटात आहेत. अशा स्थितीत इतकी मोठी रक्कम सार्वजनिक बांधकाम खात्याकडे भरणे शक्य नाही. कोरोना काळात शिक्षकांचे वेतन देणेही मुश्किल झाले आहे. त्यात हा खर्च सोसणे शक्य नाही. हा खर्च विद्यार्थ्यांकडून वसूल केल्यास त्यांच्यावरही आर्थिक बोजा पडणार आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांनी अद्याप वार्षिक शुल्क देखील भरलेले नाही. या परिस्थितीत हा वाढीव खर्च त्यांना परवडणारा नाही, असे शाळांचे म्हणणे आहे. त्यामुळे हा अवैज्ञानिक आदेश मागे घ्यावा, अशी मागणी खासगी शाळांनी केली आहे.

सरकारी शाळांना लागू नाही

इमारतीची सुरक्षितता तपासण्याची सक्ती ही केवळ खासगी शाळांना करण्यात आलेली आहे. सरकारी शाळांना हा नियम लागू केलेला नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे सर्व शाळांची सुरक्षितता तपासणी आवश्यक आहे. पण शुल्क वसुलीसाठी केवळ खासगी शाळांना लक्ष्य करण्यात येत असल्याचाही आरोप खासगी शिक्षण संस्थांनी केला आहे.

"इमारत एनअोसीसाठी कार्यकारी अभियंत्याकडे शुल्क भरण्याची सूचना खासगी शाळांना दिली आहे. पण या शाळा दोन वर्षापासून कोरोना महामारीमुळे आर्थिक संकटात सापडल्या आहे. त्यामुळे शुल्क भरणे अवगड झाले आहे."

-संजय कराळे, संस्थाचालक, एकसंबा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PMC Election: पुण्यात एकाच वार्डात शिवसेनेचे दोन AB फॉर्म! एका उमेदवाराने हातातून हिसकावला… फाडला… अन् गिळला! नेमकं काय घडलं?

Pune Municipal Election : आघाडीत बिघाडी, तर युतीत कुस्ती; खिरापतीसारखे एबी फॉर्म वाटल्याने पक्षांमध्ये अडचणी

Solapur News: द्राक्षबागायतदार संघ आक्रमक! पाच हजार टन बेदाणा भारतात आल्याचा संशय, सांगलीत चौकशी सुरू, अन्यथा आंदोलनाची तयारी!

केंद्र सरकारकडून नववर्षाची भेट! नाशिक-सोलापूरदरम्यान ‘ग्रीनफिल्ड कॉरिडॉर’; केंद्राकडून १९ हजार कोटींचा निधी!

Gopichand Padalkar : 'मराठी-कन्नड या दोन्ही भाषा माझ्यासाठी समान'; टीईटी परीक्षेबाबतही आमदार गोपीचंद पडळकरांचं महत्त्वाचं विधान

SCROLL FOR NEXT