IMG-20191211-WA0108 (1).jpg 
पश्चिम महाराष्ट्र

अभिनंदन...'या' शेतकऱ्याने वाचवले हजारो प्रवाशांचे जीव

तात्या लांडगे

सोलापूर : मनमाडहून नगरच्या दिशेने जाणारी भुसावळ-पुणे एक्‍स्प्रेस मंगळवारी (ता. 10) वांबोरीहून नगरच्या दिशेने जात होती. त्यावेळी तेथून रेल्वे लाईन क्रॉस करून आपल्या शेतातील पिकांना पाणी देण्यासाठी जात असताना रामदास बापुराव थोरात (रा. विळद, ता. नगर) यांना किलोमीटर 369.0-1 विळद-वांबोरी दरम्यान रेल्वे रूळ तुटल्याचे दिसले. रामदास यांनी त्याची समोरुन येणारी गाडी थांबविली आणि पुढील अपघात टळला.


हेही वाचाच...लक्षात ठेवा...विमा कंपनीचा चार हजार कोटींचा क्‍लेम !


वीजेचे लोडशेडींग असल्याने शेतात जायची ओढ लागली असल्याने रामदास लगबगीने रेल्वे रुळ ओलांडून पुढे जात होते. त्याचवेळी रुळावरुन रेल्वे येत असल्याने काहीतरी आवाज आला. त्यांनी बाजूला पाहिले तेव्हा रुळ तुटल्याचे दिसले. दरम्यान, भुसावळ-पुणे एक्‍स्प्रेस भरधाव वेगाने येत होती. त्याचवेळी रामदास यांनी शक्‍कल लढविली आणि जिवाची पर्वा न करता अंगातील बनियन काढून गाडी थांबविली. बनियनचा रंग लाल असल्याने तो हातात घेऊन रेल्वेच्या दिशेने धावत सुटले. वयाने आणि शरीराने दांडगे असल्याने त्यांचा दमही भरला होता. मात्र, त्यांनी हजारो जीव वाचविण्याच्या उद्देशाने जिद्द सोडली नाही. त्याचवेळी रेल्वे रुळावरून आपल्या दिशेने कोणीतरी लाल बनियन घेऊन धावत येत असल्याचे चालकाच्या लक्षात आले. घटनेचे गांभीर्य ओळखून चालकाने अर्जंट ब्रेक दाबून गाडीचा वेग कमी केला आणि थोड्या अंतरावर गाडी थांबली. त्यानंतर रेल्वे चालकाने या प्रकाराची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली आणि रुळ दुरुस्ती करुन गाडी पुढे धावली.



हेही वाचाच...वाहनांची मॅन्युअली तपासणी होणार बंद


रेल्वे प्रशासन करणार रामदास यांचा सन्मान
नगर जिल्ह्यातील विळद येथील शेतकरी रामदास बापूराव थोरात यांनी जिद्द अन्‌ चिकाटीच्या जोरावर भुसावळ-पुणे एक्‍स्प्रेस थांबवली आणि हजारो प्रवाशांचे जीव वाचवले. त्यांच्या कार्याचे कौतूक प्रवाशांसह रेल्वे प्रशासनाने केले. श्री. थोरात यांचा मध्य रेल्वेच्या सोलापूर येथील कार्यालयात श्री. थोरात यांचा प्रमाणपत्र व चार हजार रुपये रोखीने देऊन सन्मान केला जाणार आहे.

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT