Ayodhya Ram Temple at Sports Complex in Miraj
Ayodhya Ram Temple at Sports Complex in Miraj esakal
पश्चिम महाराष्ट्र

20 हजार चौरस फूट जागेवर मिरजेत साकारतेय राम मंदिराची भव्य-दिव्य प्रतिकृती; 1 कळस, 22 शिखरे, 150 कमानी, 167 खांबांची निर्मिती

अतुल पाटील

मिरजेतील क्रीडा संकुल आणि कोल्हापुरात गोकुळ शिरगावमधील 'प्रणित फायबर वर्क्स'सह याकामी १७० कारागिरांचे हात झटत आहेत. यातील शंभरावर कारागीर उत्तरप्रदेशातून आले आहेत.

मिरज : एक कळस, २२ शिखरे, १५० कमानी, १६७ खांब आणि २० हजार चौरस फूट जागेवर मिरजेत अयोध्येतील राम मंदिराची (Ram Temple Ayodhya) प्रतिकृती साकारली जात आहे. राम मंदिराची भव्य-दिव्य प्रतिकृती उभारण्यात येत आहे. अयोध्येत निर्माण होत असलेल्या राम मंदिरात २२ जानेवारीला रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर मिरजेतील तालुका क्रीडा संकुलात (Sports complex) तात्पुरते राम मंदिर साकारले जात आहे.

मंदिरात ६ फुटांची मूर्ती बसवण्यात येणार आहे. २२ जानेवारी ते २ फेब्रुवारीदरम्यान, नागरिकांना दर्शन घेता येणार आहे. कोल्हापूरच्या ‘व्हाईट लोटस क्रीएटिव्ह स्टुडिओ’चे बाबासाहेब कांबळे यांनी मंदिर निर्मितीचे शिवधनुष्य उचलले आहे. मंदिराचे काम युद्धपातळीवर सुरू असून २० तारखेला हे काम पूर्ण होणार आहे.

जागेचे पूजन २५ डिसेंबरला झाले. मंदिरनिर्मितीचे काम प्रत्यक्षात ३१ डिसेंबरला सुरू करण्यात आले. मिरजेतील क्रीडा संकुल आणि कोल्हापुरात गोकुळ शिरगावमधील 'प्रणित फायबर वर्क्स'सह याकामी १७० कारागिरांचे हात झटत आहेत. यातील शंभरावर कारागीर उत्तरप्रदेशातून आले आहेत. मंदिर फायबरचे उभारले जात आहे. जमिनीपासून कळसाचे टोकापर्यंतची उंची ६३ फूट आहे.

मंदिरासाठी १६७ खांब, १५० कमानी तयार करण्याचे काम संकुलातच सुरू आहे. मंदिराच्या सगळ्या खांबावरील भारतीय संस्कृतीतील मूर्ती, कळसावर गरूड, मंदिराच्या सुरवातीला हत्ती, सिंह, हनुमान, जय-विजय मूर्ती साकारण्याचे काम जोरदार सुरू आहे. जोडणीचे काम सुरू असून येत्या ११ दिवसांत उर्वरित फायबर कास्टिंग, फिनिशिंग आणि रंगकाम पूर्ण करण्यात येणार आहे.

अयोध्येतील राम मंदिर निर्मितीचा कच्चा आराखडा पाहिला आहे. संदर्भ तपासून अभ्यास करून मंदिराची निर्मिती करत आहे. उदगीरचे अखिल भारतीय मराठी संमेलन, गोवा फेस्टिव्‍हलची कामे केली आहेत. मात्र, हा प्रकल्प २० दिवसांत पूर्ण करण्याचे मोठे आव्हान आहे. सकाळी आठ ते रात्री ११ पर्यंत काम केले जात आहे. दोन दिवसआधीच ते पूर्ण करण्यात येईल.

-बाबासाहेब कांबळे, व्हाईट लोटस क्रीएटिव्ह स्टुडिओ

कोल्हापूरच्या ‘व्हाईट लोटस् क्रीएटिव्ह स्टुडिओ’च्या माध्यमातून अयोध्येतील राम मंदिराची भव्य-दिव्य प्रतिकृती मिरजेत साकारली जात आहे. या निर्मितीत गोकुळ शिरगावमधील 'प्रणित फायबर वर्क्स'च्या कारागिरांचेही हात झटत आहेत. फायबर कास्टिंग, फिनिशिंग आणि रंगकाम 22 तारखेच्या आतमध्ये पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न असेल.

-पाडुरंग भोसले, प्रणित फायबर वर्क्स, गोकुळ शिरगांव

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT