First time closed godadmahaj mandir 
पश्चिम महाराष्ट्र

कोरोना व्हायरस ः सव्वाशे वर्षांत प्रथमच गोदड महाराज मंदिर बंद 

सकाळ वृत्तसेवा

कर्जत : अहमदनगर कोरोना व्हायरस पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या आदेशानुसार शहरासह तालुक्‍यातील सर्व मोठ्या गावांतील व्यवहार आज बंद करण्यात आले. त्यात कर्जतचे ग्रामदैवत गोदड महाराज मंदिर 120 वर्षांनंतर प्रथमच आज दर्शनासाठी बंद करण्यात आले. 

शहरासह तालुक्‍यातील मोठ्या गावांतील दुकाने, रसवंतीगृहे, हॉटेल, चहा टपऱ्या, सराफ दुकाने आदी बंद करण्यात आले. याबाबत प्रांताधिकारी अर्चना नष्टे, पोलिस उपअधीक्षक संजय सातव, तहसीलदार छगन वाघ, पोलिस निरीक्षक सुनील गायकवाड, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी गोविंद जाधव यांनी सर्व दुकाने बंद केली. यामुळे एरवी गर्दीने ओसंडून वाहणारे रस्ते व शहर सुनेसुने वाटत होते. 

तालुक्‍याचे आराध्य दैवत संत गोदड महाराज मंदिर आणि मांदळी येथील आत्माराम गिरी महाराज मंदिर बंद ठेवण्यात आले आहे. एकादशीच्या निमित्ताने संत गोदड महाराज मंदिरातील कीर्तन व फराळ महाप्रसाद आणि दुसऱ्या दिवशी द्वादशीचे पंचपक्वान्न महापंगत 180 वर्षांनंतर खंडित झाली आहे.  

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

धारावीत रात्री १० नंतरही शिवसेनेचा प्रचार, काँग्रेस कार्यकर्त्यांनी ताफा अडवल्यानं शिंदेंवर दौरा अर्धवट सोडण्याची वेळ; VIDEO

Nagpur News: विद्यार्थी नसल्यानं मराठी शाळा बंद कराव्या लागतायत, राज्य सरकारचा युक्तिवाद, हायकोर्टानं फटकारलं..

Viral Video : भारत असुरक्षित म्हणतात अन् बांगलादेशात 'बाऊंड्री'वरून हाणामारी; क्रिकेट सामन्यात तुफान राडा, महिलांनाही धक्काबुक्की

Latest Marathi News Live Update : मनपा निवडणूक प्रचाराचा आज शेवटचा दिवस, मुख्यमंत्र्यांचा दुचाकीवरून रोड शो

घराच्या बांधकामावेळी 'या' ऐतिहासिक गावात सापडलं गुप्तधन; सोन्याच्या दागिन्यांनी भरलेलं तांब्याचं भांडं, गुप्तधन सापडताच आठवीत शिकणाऱ्या प्रज्वलनं...

SCROLL FOR NEXT