पश्चिम महाराष्ट्र

Coronavirus : 'त्यांचा' अहवाल आला; सातारकरांनाे आता सर्व काही तुमच्यावरच अवलंबून

सकाळ वृत्तसेवा

सातारा : कोरोनासदृश्‍य लक्षणे दिसल्याने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या आणखी दोघांच्या घशातील स्त्रावांच्या तपासणीचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे साताऱ्यात अद्याप तरी, कोरोनाचा रूग्ण नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
 
अबूधाबीवरून आलेल्या युवकाला लक्षणांवरून दोन दिवसांपूर्वी उपचारासाठी विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सहा वर्षाच्या मुलीलाही तशीच लक्षणे असल्यामुळे दाखल केले होते. मात्र, या दोघांच्याही तपासणी अहवालात कोरोनाची बाधा झाली नसल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर दोन युवकांना स्थानिक पातळीवरील आरोग्य यंत्रणांनी तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठविले. जिल्हा रुग्णालयांमध्ये त्यांची तपासणी करण्यात आली. कोरोनासदृश्‍य लक्षणे वाटत असल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना उपचारासाठी विलगीकरण कक्षात दाखल केले. त्यांच्या घशातील स्त्रावाचे नमुने काढण्यात आले हाेते. हे नमुने तपासणीसाठी रासयनिक प्रयोगशाळेत पाठविण्यात आले हाेते. उपचारसाठी दाखल करण्यात आलेल्यांपैकी एक जण अबूधाबी येथून आला आहे, तर दुसरा हा दुबईवरून आल्याची माहिती मिळाली.
 
या दोघांच्या घशातील स्त्रावाचे नुमने पुण्याला पाठविण्यात आले होते. गुरुवारी रात्री उशीरा त्याचा अहवाल मिळाला. त्यातून दोघांनाही कोरोनाची बाधा झाली नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे जिल्हा प्रशासनासह जिल्ह्यातील नागरिकांच्या दृष्टीने ही चांगली बातमी मिळाली आहे. आता सर्वांनी मिळून आवश्यक ती काळजी घेत आवश्यकता असली तरच घराबाहेर पडावे. जेणेकरुन रस्त्यांवर गर्दी हाेणार नाही. 



विलगीकरण कक्षात असलेल्या त्या दोन्ही युवकांचे रिपोर्ट आले निगेटिव्ह ; कोरोना संसर्ग नाही

 हेही वाचा : अरेच्चा ! महाराष्ट्रातील ही शाळाच सुरु 

सातारा : शारजाह (युएई) येथून प्रवास करुन आलेला सातारा जिल्ह्यातील 29 वर्षे युवकाला सर्दी व घसा दुखत असल्याने   जिल्हा रुग्णालयात कोविड-19 या आजाराचा अनुमानित रुग्ण म्हणून 18 मार्च रोजी रात्री दाखल करण्यात आले होते. तसेच सौदी अरेबिया येथून प्रवास करुन आलेला एक 22 वर्षीय युवकाला सर्दी व ताप असल्याने जिल्हा रुग्णालयात कोविड-19 या आजाराचा अनुमानित रुग्ण म्हणून 18 मार्च रोजी रात्री दाखल करण्यात आले होते.  या दोघांच्या घशातील स्त्रावांचे नमुने पुण्यात एन.आय.व्ही. कडून प्राप्त झाले असून दोन्ही युवकांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे ते दोन्ही युवक कोरोना संसर्गित नाहीत अशी माहिती जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TEJASWIN SHANKAR HISTORICAL MEDAL: तेजस्विन शंकरने इतिहास घडवला! खडतर अशा डेकॅथलॉन स्पर्धेत भारताला जिंकून दिले पहिले पदक

रशियन तेल खरेदी करणाऱ्यांवर अमेरिकेकडून शंभर टक्के टॅरिफ; ट्रम्प यांच्या प्लॅनवर भारताची पहिली प्रतिक्रिया

Koyna Dam: कोयना धरणाचा मध्यरात्री मोठा विसर्ग! 23,520 क्युसेक पाणी नदीत; कृष्णा-कोयना काठावरील गावांना अलर्ट

Commonwealth Games 2026: भारताची 'ज्युदो'त पदक हॅटट्रिक! LIC एजंटच्या लेकीच्या जिद्दीला सलाम; कोण आहे यामिनी मौर्य?

Leopard Attack: श्वानाच्या धाडसाने बिबट्याला पळवले! पुरंदरात कालवडीवरचा हल्ला फसला, मध्यरात्री रंगला थरार..

SCROLL FOR NEXT