Councilors interrupted ZP meeting for School Construction 
पश्चिम महाराष्ट्र

नगरसेवक घुसले जिल्हा परिषदेच्या आढावा बैठकीत 

दौलत झावरे

नगर : केडगावमधील इंदिरानगरच्या जिल्हा परिषद शाळेच्या तीन वर्गखोल्या मोडकळीस आल्या आहेत. त्या दुरुस्त कराव्यात, या मागणीचे निवेदन घेऊन नगरसेवक मनोज कोतकर जिल्हा परिषदेत गेले होते. यापूर्वीही या प्रश्‍नावर ते जिल्हा परिषदेत गेले होते; मात्र त्यांना अधिकारी भेटले नव्हते. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवराज पाटील समाजकल्याण विभागाची आढावा बैठक घेत होते. त्यामुळे नगरसेवक कोतकर थेट बैठकीत घुसले. 

मुख्य कार्यकारी अधिकारी पाटील यांच्याकडे जात त्यांना मागणीचे निवेदन दिले. यावर पाटील यांनी, शाळेच्या दुरुस्तीसाठी दोन वर्षांपासून महापालिकेकडे पत्रव्यवहार होत असून, महापालिकेकडूनच "ना हरकत' प्रमाणपत्र मिळत नसल्याने दुरुस्तीसाठीचा साडेआठ लाख रुपयांचा निधी परत जाण्याच्या स्थितीत असल्याचे सांगण्यात आले. 

तीन खोल्या मोडकळीस 

केडगावमध्ये ग्रामपंचायत असताना इंदिरानगरमध्ये जिल्हा परिषदेने ग्रामपंचायतीच्या रिकाम्या जागेत प्राथमिक शाळा बांधली. 2003मध्ये केडगाव ग्रामपंचायत महापालिकेमध्ये समाविष्ट झाली. त्यामुळे या शाळेच्या दुरुस्तीसाठी महापालिका प्रशासनाकडून "ना हरकत' दाखला आवश्‍यक आहे. नगरसेवक मनोज कोतकर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की केडगावच्या इंदिरानगरमध्ये जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा आहे. तिची इमारत 1992मध्ये बांधण्यात आली आहे. शाळेला चार वर्गखोल्या असून, त्यांतील तीन खोल्या मोडकळीस आल्या आहेत. 

विद्यार्थ्यांसमवेत आंदोलनाचा इशारा 

भिंतींना अनेक ठिकाणी तडे गेले आहेत. छताचे पत्रे गंजले असून, लाकडी खांब जीर्ण झाले आहेत. एका वर्गखोलीचा पाया खचलेला आहे. मोहिनीनगर येथील जगदंबा शाळेच्या वर्गखोल्यांचे बांधकाम अत्यंत जुने आहे. दोन्ही शाळांमध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी जीव मुठीत धरून वर्गात बसतात. शाळा धोकादायक बनली असल्याने, निंबोडी घटनेची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी. या शाळाखोल्यांची दुरुस्ती न केल्यास विद्यार्थ्यांसमवेत आंदोलन करण्याचा इशारा कोतकर यांनी निवेदनात दिला आहे. 

अघटित घटल्यास जिल्हा परिषद जबाबदार 
केडगावच्या इंदिरानगरची जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व मोहिनीनगरची जगदंबा शाळा यांच्या बांधकामाचे "ना हरकत' प्रमाणपत्र महापालिका प्रशासनाने जिल्हा परिषदेला द्यावे, यासाठी पाठपुरावा करणार आहे. जिल्हा परिषद प्रशासनाने लवकरात लवकर या शाळेचे काम सुरू करण्यासाठी प्रयत्न करावेत, अन्यथा अघटित प्रकार घडल्यास त्यास जिल्हा परिषद जबाबदार राहील. 
- मनोज कोतकर, नगरसेवक 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यात सैराटपेक्षाची भयानक घटना! प्रेमविवाह केल्याचा मनात राग, तिघांनी सलूनचं सेटर लावलं अन् तरुणावर कोयत्याने वार

Pune News: अमली पदार्थ विरोधी पथकाची माेठी कारवाई! 'कोंढवा, बिबवेवाडीतून २७ लाखांची अफू', मेफेड्रोन जप्त; दोघांना अटक

Dhule News: जोडपं गाढ झोपेत असतानाच नियतीनं डाव साधला, सुखी संसार अर्ध्यावरच संपला; धुळ्यातील दुर्दैवी घटना

DY Chandrachud: माजी CJI चंद्रचूड अजूनही सरकारी बंगल्यातच, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पत्र, मोठं कारण आलं समोर

परिवहन मंत्र्यांचे आदेश! 'शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नयेत'; सव्वापाच लाख प्रवासाचे पास वाटप

SCROLL FOR NEXT