crime case in belgaum father attack son and he dead in accident reason money 
पश्चिम महाराष्ट्र

लेकराची अवस्था पाहून आईने फोडला हंबरडा; अंध मुलाचा बापानेच केला खून

सकाळ वृत्तसेवा

अथणी (बेळगाव) : पैशाची मागणी केल्याने अंध मुलाचा बापानेच धारदार शस्त्राने वार करुन खून केला. अथणी तालुक्यातील सत्ती गावात मंगळवारी (२३) सायंकाळी ही घटना घडली. गुरुलिंग सिद्धाप्पा जकापण्णावर-दानसोर (वय ३६) मयत युवकाचे नाव आहे. संशयित सिद्धाप्पा जकापण्णावर याला अटक केली आहे. अथणी पोलिस ठाण्यात घटनेची नोंद झाली असून पुढील तपास सुरू आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, मयत गुरुलिंग जकापण्णावर याने आपले वडील सिद्धाप्पा जकापण्णावर याच्याकडे पेन्शनच्या पैशाची मागणी केली होती. पण त्याने पैसे देण्यास नकार दिला. तसेच त्याचा राग मनात धरून घरात कोणी नसल्याचे पाहून धारदार शस्त्राने सपासप वार केले. त्यानंतर निर्दयीपणे तो गावात निघून गेला. गुरुलिंगची आई इरव्वा ही बाहेरुन घरात आल्यावर पाहताच तो रक्ताच्या धारोळ्यात पडलेल्या अवस्थेत पाहून आक्रोश केला. मुलाला या अवस्थेत पाहून आईने हंबरडा फोडला. तिचा आवाज ऐकून आजूबाजूच्या लोकांनी गर्दी केली.

मुलाने वडील सिद्धाप्पा जकापण्णावर यांच्याकडे पैशाची मागणी केली होती. त्यातून हा खून झाल्याची नोंद अथणी पोलिस ठाण्यात झाली आहे. घटनास्थळी अथणीचे पोलिस उपाधीक्षक एस. व्ही. गिरीश, मंडळ पोलिस निरीक्षक शंकरगौडा बसगौडर, पोलिस उपनिरीक्षक कुमार हडकर यांनी भेट देऊन पाहणी केली. गुरुलिंग याचा खून पैशासाठी की अन्य कारणासाठी झाला याचा शोध घेण्यात येत आहे. उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. त्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले. मयत गुरुलिंग याच्या मागे आई, वडील, पत्नी, भाऊ असा परिवार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubhanshu Shukla Research : शुभांशु शुक्लांनी अंतराळात केला थरारक प्रयोग! बनले 'या' खास गोष्टीवर संशोधन करणारे पहिले भारतीय..

Nagpur Fraud: खोट्या रजिस्ट्रीच्या आधारे उचलले ३८ लाखांचे गृहकर्ज

Pune News : रस्त्याच्या मधोमध झाडामुळे अपघाताचा धोका; प्रयेजा सिटी सोसायटी परिसरातील स्थिती, जवळच शाळा असल्याने चिंता

Latest Maharashtra News Live Updates: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू डॉ. शं. ना. नवलगुंदकर यांचे दुःखद निधन

Pune News : नानासाहेब पेशवेंच्या समाधीची दुरवस्था; परिसरात कचऱ्याची समस्या; महापालिकेच्या दुर्लक्षामुळे ऐतिहासिक वारसा उपेक्षित

SCROLL FOR NEXT