पश्चिम महाराष्ट्र

तीन पानी जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; सांगलीत 8 जणांना अटक

सुमारे तीन लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला

सकाळ डिजिटल टीम

सांगली : विश्रामबाग परिसरातील (vishrambag area sangli) पाटील मळ्यातील कुंतीनाथ शामराव पाटील यांच्या जनावरांच्या गोठ्यात चालणाऱ्या तीन पानी जुगार अड्ड्यावर (crime news) पोलिसांनी छापा टाकला. यात आठ जणांना अटक करण्यात आली असून सुमारे तीन लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. विश्रामबाग पोलिसांच्या पथकाने ही कारवाई केली.

संजय कुमगोंडा पाटील (वय ५०), सुशांत जयकुमार चौगुले (वय ४२), शुभम शांतिनाथ पाटील (वय २६), नीलेश अण्णासो पाटील, राहुल संजय वठारे (वय ३५), राकेश संजय वठारे (वय ३५), सचिन सुधाकर आवटी (वय ४२), संदीप रामगोंडा पाटील (वय ३२, सर्व रा. इनामधामणी, मिरज), प्रदीप जगोंडा पाटील (वय ४५, नेमिनाथनगर, सांगली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की जुगारसह अवैध धंद्यांवर कारवाईचे आदेश पोलिस अधीक्षक दीक्षित गेडाम, अपर अधीक्षक मनीषा दुबुले, उपाधीक्षक अजित टीके यांनी दिले आहेत. त्यानुसार विश्रामबागचे सहायक निरीक्षक अमितकुमार पाटील, पोलिस विलास मुंढे, सर्जेराव पवार, मिथुन गंगधर, सुदर्शन पाटील, जयसिंग अहिरे, चालक जावेद अत्तार यांचे पथक विश्रामबाग परिसरात गस्तीवर होते.

त्यावेळी पाटील मळ्यातील कुंतीनाथ शामराव पाटील यांच्या जनावरांच्या गोट्यात चालणाऱ्या तीन पानी जुगार अड्डा (crime) सुरू असल्याची माहिती पथकास मिळाली. त्यानुसार छापा टाकण्यात आला. संशयित आठ जण (8 peope arrested police) जुगार खेळताना रंगेहात मिळून आले. संशयितांकडून दहा हजारांची रोकड, सहा दुचाकी असा तीन लाख १५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. संशयितांवर महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur District Bank : जिल्हा बँकेच्या खिद्रापूर शाखेत ४० लाखांचा अपहार शिपायाचा कारनामा; शाखाधिकारी, लिपिकाचा यूजर वापरून काढले पैसे

Asian Games 2026: भारतीय पुरुष कबड्डी संघ उपांत्य फेरीत! बांगलादेशला लोळवले, आता उपांत्य फेरीत Pakistanला भिडणार?

Mumbai-Goa Highway : ठेकेदार कंपनीचा १८ कोटींचा दंड थकीत विनापरवानगी नदीत खोदाई; एकाचा बळी गेल्यानंतर कारवाईला वेग

Marathi News Live Updates : पक्ष फोडणाऱ्या टोळीचे प्रमुख ज्ञानेश कुमार , त्यांना तातडीने तुरुंगात टाका: उद्धव ठाकरे घणाघात

Indrayani River Pollution : ‘इंद्रायणी’वर पुन्हा एकदा विषारी फेसाची चादर ; प्रशासकीय निष्क्रियतेमुळे लाखो वारकऱ्यांच्या श्रद्धेचा, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

SCROLL FOR NEXT