google
google
पश्चिम महाराष्ट्र

विट्यात भाजी विक्रेत्याचा होरपळून दुर्दैवी मृत्यू

सकाळ डिजिटल टीम

विटा : चारचाकी मोटारगाडी सुरू करताना अचानक गाडीने पेट घेतल्याने भाजीविक्रेत्याचा (car fire accident) होरपळून जागीच मृत्यू झाला. रघुनाथ रामचंद्र ताटे (वय ५०, विवेकानंदनगर, विटा) असे मृताचे नाव आहे. ही घटना आज पहाटे साडेपाचच्यापूर्वी घडली. या घटनेची माहिती अजित अशोकराव गायकवाड यांनी फोनवरून विटा पोलिसात (vita police) दिली. ताटे हे विटा - कऱ्हाड रस्त्यालगत असलेल्या नीलसागर हॉटेलच्या पाठीमागे (hotel nilsagar) राहतात. ते परिसरात गाडीतून फिरून भाजीपाला व किराणा मालाच्या साहित्य विक्रीचा व्यवसाय करतात. (crimenews) (crime cases in vita sangli one person dead in car fire accident

घराजवळ लावलेल्या चारचाकी गाडी (एमएच ०१, व्ही २४०९) मधील भाजीपाला विक्रीसाठी घेऊन जाण्यासाठी ते आज नेहमीप्रमाणे पहाटे साडेपाच पूर्वी गाडीत बसले. त्यांनी गाडीचा स्टार्टर सुरू करताच अचानक शॉर्टसर्किट होऊन गाडीने पेट घेतला. ((crimenews) गाडीत भाजीपाला असल्यामुळे त्यांना लवकर गाडीतून बाहेर येता येईना. त्यामुळे त्यांनी आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. आरडाओरडा ऐकून त्यांचा मुलगा घरातून बाहेर आला. त्यावेळी गाडीने चारी बाजूंनी पेट घेतल्याचे व त्याचे वडील गाडीत अडकलेले दिसले. त्याने आग विझवून वडिलांना गाडीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, आग आटोक्यात आली नाही. तोपर्यंत त्याच्या वडिलांचा होरपळून जागीच मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naseem Khan: नसीम खान यांची नाराजी दूर करण्यात काँग्रेसला यश? पुण्यात धंगेकरांच्या प्रचारासाठी लावली हजेरी

MI vs KKR Live IPL 2024 : मुंबईच्या गोलंदाजांची कमाल, केकेआरला पॉवर प्लेमध्येच दिले चार धक्के

Rohit Sharma MI vs KKR : टी 20 वर्ल्डकपचा संघ जाहीर होताच मुंबईच्या प्लेईंग 11 मधून रोहितचं नाव गायब, काय आहे कारण?

Pune Loksabha election 2024 : ''आरक्षणाच्या पन्नास टक्क्यांच्या मर्यादेबद्दल मोदींनी भूमिका जाहीर करावी, आमचं ठरलंय...'' राहुल गांधी स्पष्टच बोलले

Latest Marathi News Live Update : जीएसटी फक्त अदानींच्या फायद्याचा- राहुल गांधी

SCROLL FOR NEXT