crime cases in sangli police constable drown and dead
crime cases in sangli police constable drown and dead 
पश्चिम महाराष्ट्र

दुर्दैवी! नुकतेच लग्न झालेल्या तरुण पोलिसाचा बुडून मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

तुंग (सांगली) : कसबेडिग्रज मौजेडिग्रज (ता. मिरज) येथील बंधाऱ्याजवळ सुनील गणपतराव पाटील (वय 30) रा. अष्टविनायक माधवनगर येथील पोलिस युवकाचा बुडुन मृत्यू झाला. मित्रासमवेत ते पोहण्यासाठी आले होते. पोहताना ते अचानक बुडू लागले. या तरुणास पोहायला येत होते असे त्याचे नातेवाईक सांगतात. लगेचच शोधमोहीम सुरू केली. परंतु मृतदेह हाती लागला नव्हता. शनिवारी सांगली ग्रामीण पोलिस आणि नातेवाईकांनी आयुष हेल्पलाईन संपर्क साधला. आयुष हेल्पलाईनच्या मदतीने शोधमोहीम चालू होती. रात्री उशिरा मृतदेह शोधण्यास यश आले. हा तरुण पोलिस दलामध्ये होता. त्याचे नुकतेच लग्न झाले होते असे समजते. 

यावेळी आयुष हेल्पलाईन टिमचे टिम प्रमुख अविनाश पवार, अमोल व्हटकर, रुद्र कांरडे, अजित रायमाने, चिंतामणी पवार, प्रणाली चव्हान, अर्जुन ठाकूर, विश्वसेवा फाऊंडेशनचे गजानन नरळे, अजिंक्‍य बोळाज, सुरेश, योगेश आवटी, गणेश आवटी, अभिजित गुजर, स्पेशल रिसक्‍यू टिम तसेच विश्वश्री सेवा मंडळ सांगलीवाडी, बसवराज हिरेमठ सेवा संस्था या टिमने शोध मोहीम हाती घेतली होती. सांगली ग्रामीणचे पोलिस निरीक्षक बेदरे, मौजेडिग्रजचे पोलिस पाटील सतीश पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parveen Shaikh: इस्रायल-हमास युद्धावर पोस्ट केल्याने प्रिन्सिपलवर नोकरी गमावण्याची वेळ

नेत्याचे एका दिवसात दोन पक्षप्रवेश, आधी शिंदे गटात मग ठाकरे गटात; काय आहे प्रकरण?

CSK प्लेऑफच्या शर्यतीत फसली! विजयासह पंजाब किंग्सचे आव्हान कायम; चेन्नईचा पाचवा पराभव

Eknath Shinde: ठाण्याचे किल्लेदार शिंदेच; मतदारसंघ खेचून घेतलाच, ठाकरेंशी होणार थेट लढत

Latest Marathi News Live Update : पुढील 24 तासांत कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT