crime news in belgaum one person dead in sleep
crime news in belgaum one person dead in sleep 
पश्चिम महाराष्ट्र

लेकरासाठी खटला मागे घेतला तरी आईचा छळ ; शेवटी काळानेच मुलाला दिली शिक्षा

सकाळ वृत्तसेवा

बेळगाव : मालमत्तेच्या वादातून आई व भावोजीला शिवीगाळ करून मारहाण करणाऱ्या मुलाचा झोपेतच मृत्यू झाला. काल (ता. १०) रात्री ही घटना घडली. श्रवण उत्तमदास हिरेमणी (वय ५०, रा. देवांगनगर दुसरा क्रॉस, कलमेश्‍वर रोड, वडगाव) असे त्याचे नाव आहे.

आईच्या नावावर असलेले घर श्रवणने आधी आपल्या नावे करुन पत्नीच्या नावे केले होते. मात्र, आईची व्यवस्थित देखभाल न करता छळवणूक सुरू केली होती. तसेच घरही सोडण्यास सांगितले होते. त्यामुळे, विजयालक्ष्मी यांनी मार्च २०१४ मध्ये याविरोधात न्यायालयात खटला दाखल केला. त्यावेळी श्रवणने आई विजयालक्ष्मी यांच्याकडे जाऊन खटला मागे घेण्याची विनंती केली होती. मुलावर विश्‍वास ठेवून आईने खटला मागे घेतला.

मात्र, श्रवणने पुन्हा सतावणूक सुरु केल्याने त्यांनी नोव्हेंबर २०२० पुन्हा खटला दाखल केला. याची सुनावणी सोमवारी झाली. त्याच दिवशी विजयालक्ष्मी या मुलगी कांचन आणि जावई मोहनकुमार यांच्यासोबत घरात असताना संशयित श्रवणने घर आपले असल्याचे सांगत कुलूप घालण्याचा प्रयत्न केला.

यावरुन संशयित व जावई मोहनकुमार यांच्या वादावादी होऊन हाणामारी झाली. याप्रकरणी विजयालक्ष्मी यांनी शहापूर पोलिसात फिर्याद दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा नोंदविला होतो. त्याचा मनस्ताप होऊन बुधवारी रात्री त्याचा झोपलेल्या ठिकाणीच मृत्यू झाला. 

संपादन - स्नेहल कदम 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT