crime esakal
पश्चिम महाराष्ट्र

मुलाशी अनैसर्गिक संबंध ठेवले, पोलीस हवालदारावरच गुन्हा दाखल

युवकाने मी मैत्रिणीला भेटून आलो असल्याचे सांगितले.

- शांताराम पाटील

इस्लामपूर : महाविद्यालयीन युवकाला ब्लॅकमेल करत अनैसर्गिक संबंध ठेवण्यास भाग पाडून त्याची व्हिडीओ क्लिप व्हायरल करण्याची धमकी देत खंडणी घेतल्या प्रकरणी इस्लामपूर पोलिस ठाण्याचा हवलदार हणमंत कृष्णा देवकर (वय ३४, रा. इस्लामपूर) याच्यावर इस्लामपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी कृष्णात पिंगळे यांनी आज पत्रकार बैठकीत दिली. ते म्हणाले, 27 ऑक्टोबरला पहाटे तीनच्या सुमारास हणमंत देवकर आणि आणखी एक कर्मचारी येथील एका रस्त्यावर पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी एक महाविद्यालयीन युवक आपल्या मैत्रणीला भेटून पुन्हा वस्तीगृहात येत होता. तेथे उपस्थित असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांनी त्याला अडवले. आता कोठून आलास ? इथे काय करतोयस ? अशी विचारणा केली. त्या युवकाने मी मैत्रिणीला भेटून आलो असल्याचे सांगितले. पोलिसांनी त्या युवकांकडून त्याचा फोन नंबर घेतला.

२९ ऑक्टोबरला तो युवक ज्या महाविद्यालयात शिकत होता, त्या महाविद्यालयाच्या गेटजवळ जात हणमंत हवलदार याने त्या युवकास फोन करुन भेटायला येण्यास सांगितले. सकाळी सव्वा अकराच्या सुमारास संबंधित युवक पोलिसांना भेटला. त्याच्याकडे पैशाची मागणी करत पैसे न दिल्यास त्याचे प्रेम प्रकरण तुझ्या व मैत्रिणीच्या घरी सांगेन अशी धमकी दिली. त्यावर युवकाने आपल्या मित्रांच्याकडून ४००० रुपये उसने घेवून हणमंत देवकर याला दिले. तेवढ्यावर न थांबता देवकर याने तरुणाच्या मैत्रिणीचा मोबाईल नंबर दे, तिला माझ्याबरोबर शारिरीक संबंध ठेवायला सांग असे सांगितले. संबंधीत तरुणाने ती मुलगी चांगल्या घरातील आहे असे सांगून तसे करण्यास स्पष्ट नकार दिला. त्यावर देवकर याने तु तसे न केल्यास तुझ्याबरोबर शारिरीक संबंध ठेवेन असे सांगितले. त्यावर संबंधीत तरुण घाबरला.

देवकर याने त्याला त्याच्या वसतीगृहातील रुमवर नेले. रुमवर असलेल्या मित्राला दुसऱ्या रुममध्ये जाण्यास सांगितले. तेथे देवकर याने त्या तरुणाशी अनैसर्गिक संबंध ठेवले व त्याची व्हीडीओ क्लिप तयार करुन तो तेथून निघून गेला. २१ नोव्हेंबरला दुपारी साडेबाराच्या सुमारास हवलदार देवकर याने पुन्हा त्या युवकास मोबाईलवर फोन करुन महाविद्यालयाच्या गेटवर बोलावून घेतले, शारिरीक संबंधाची मागणी केली. तसे न केल्यास मोबाईलमधील क्लीप दाखवून तो व्हायरल करण्याची धमकी दिली. संबंधीत तरुणाने हा प्रकार आपल्या मित्रांना सांगून हवलदार देवकर याच्या विरोधात इस्लामपूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी तात्काळ हवलदार देवकर याला अटक केली. हवलदार देवकर याच्यावर अनैसर्गिक संबंध ठेवणे, खंडणी, अश्लील क्लिप व्हायरल करणे, धमकावणे असे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Motivation Story : 'संकटातही सोडत नाहीत पत्‍नीचा हात'; रहीम भाई व अनसना यांचा संघर्षमय प्रवास

Yogi Adityanath : माफिया मुख्तार अंसारीच्या जागेवर गरिबांचे हक्काचे घर! मुख्यमंत्री योगींनी ७२ कुटुंबांना सोपवली चावी

Dev Diwali 2025: आयुष्यात फक्त आनंदच आनंद असो... देव दिवाळीनिमित्त तुमच्या मित्रपरिवाराला द्या खास शुभेच्छा!

Happy Birthday Virat Kohli: बर्थ डे आहे, भावाचा...! विराट कोहलीचे हे तीन रेकॉर्ड त्याला भारताचा सर्वोत्तम कर्णधार बनवतात...

Pushkar Singh Dhami : ‘नीती आयोगा’त अव्वल, शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीत देशात पहिला क्रमांक; उत्तराखंडला ‘विकासाचे मॉडेल राज्य’ बनवण्याचा धामींचा संकल्प”

SCROLL FOR NEXT