sangli crime news 
पश्चिम महाराष्ट्र

लग्नानंतर सहाव्या दिवशी प्रियकरासोबत केली आत्महत्या, विषारी औषध पिऊन संपवलं जीवन

एकमेकांना फोन करुन दोघांनीही आपापल्या घरी विष पिऊन आत्महत्या केली

सकाळ डिजिटल टीम

एकमेकांना फोन करुन दोघांनीही आपापल्या घरी विष पिऊन आत्महत्या केली

सांगली जिल्ह्यात प्रेमी युगुलाने विषारी औषध पिऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जत तालुक्यातील एकुंडी या गावात ही घटना घडली आहे. या घटनेमुळे लोक हळहळ व्यक्त करत आहेत. अश्विनी गजानन माळी आणि लक्ष्मण संभाजी शिंदे अशी मृत प्रेमी युगुलाची नावं असून एकमेकांना फोन करुन दोघांनीही आपापल्या घरी विष पिऊन आत्महत्या केली. या घटनेची नोंद जत पोलिस ठाण्यात झाली आहे. (sangli crime news)

मिळालेली माहिती अशी की, मृत अश्विनी हीचा सहा दिवसांपूर्वीच विवाह झाला होता. मात्र अश्विनी आणि लक्ष्मण या दोघांचं एकमेकांवर प्रेम होतं. या दोघांचे प्रेमसंबंध कुटुंबियांना पसंत नव्हते त्यामुळे अश्विनीच्या कुटुंबियांनी तिचा विवाह सलगरे इथल्या तरुणाशी करुन दिला होता. लग्नानंतर ती रविवारी (5 जून) एकुंडी इथे माहेरी आली असता सोमवारी (6 जून) रोजी सकाळी अश्विनी आणि लक्ष्मण यांनी एकमेकांना फोन करुन आत्महत्या करण्याचं ठरवलं. यानंतर दोघांनीही आपापल्या घरी विषारी द्रव्य पिऊन आत्महत्या केली असल्याची माहिती समोर येत आहे.

दरम्यान, विष प्यायलानंतर सकाळी साडेसातच्या सुमारास अश्विनी आणि लक्ष्मणला अस्वस्थ वाटू लागले. नातेवाईकांनी त्यांना तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल केलं. परंतु उपाचारपूर्वीच त्या दोघांचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यानंतर शवविच्छेदनासाठी त्यांचे मृतदेह जत ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. या दोन्ही घटनांची नोंद जत पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुलासह कुटुंब संपवेन! व्हिडीओ कॉलवर कपडे काढायला लावले; ४३ वर्षीय महिलेचा VIDEO केला व्हायरल; २३ ते २८ वर्षांच्या तिघांना अटक

Pune Crime : कारागृहातूनही आंदेकर टोळी सक्रिय; पुणे पोलिस आयुक्तांचे कारागृह प्रशासनाला कडक निर्बंधांचे पत्र

America-Pakistan Relations: 'शांतिदूत' बनलेल्या पाकिस्तानला अमेरिकेचा दणका; ट्रम्प यांचा 'तो' प्रस्ताव ऐकून शहबाज यांना शब्द फुटेना

NEET paper leak: मनीषा हवालदार 'एनटीए'मध्ये अनुवादक म्हणून होती कार्यरत; पेपर कसा फोडला? तपासात झालं उघड

Panshet Tragedy: पानशेत धरणात कोंढव्यातील २२ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू; मित्रांसमोर घडली दुर्दैवी घटना

SCROLL FOR NEXT