sangli esakal
पश्चिम महाराष्ट्र

सांगलीत कुख्यात गुंडाचा खून; धारदार शस्त्राने सपासप वार

संशयित हल्लेखोर ताब्यात; वादातून कृत्य केल्याचे स्पष्ट

सकाळ वृत्तसेवा

संशयित हल्लेखोर ताब्यात; वादातून कृत्य केल्याचे स्पष्ट

सांगली : आर्म ॲक्ट, चोरी आणि खंडणीसारखे गुन्हे नावावर असलेला गुंड नवनाथ दिलीप लवटे (navnath lavate) (वय ३०, रा. शिवशंभो चौक) याचा सायंकाळी साडेसातच्या सुमारास उत्तर शिवाजीनगरमधील कॅफेसमोर धारदार शस्त्राने वार करून निर्घृण खून करण्यात आला. या प्रकरणी संशयित हल्लेखोर गुंड योगेश दिलीप शिंदे (वय २५, रा. लक्ष्मीमंदिरजवळ, सांगली) याला विश्रामबाग पोलिसांनी ताब्यात घेतले. दोघांमध्ये वाद होऊन त्याचे पर्यवसान खुनात झाल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले. (Sangli News)

पोलिसांनी दिलेली आणि घटनास्थळी मिळालेली माहिती अशी ः नवनाथ लवटे २०१७ पासून पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्यावर आर्म ॲक्ट, चोरी आणि खंडणीचे गुन्हे दाखल आहेत. (Sangli police) तो काही वर्षांपासून संजयनगर येथील साथीदाराबरोबर वावरत होता. जानेवारी २०२२ मध्ये बाजार समितीचे संचालक बाळासाहेब बंडगर यांच्याकडे दहा लाखांची खंडणी मागत त्यांच्या मुलाला काठी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण केल्याचा प्रकार घडला होता. या प्रकरणी विश्रामबाग पोलिस ठाण्यात लवटेसह संशयित सतीश फोंडे, सागर पारेकर, दत्ता फोंडे, अक्षय चोपडे, युवराज बजबळे या सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल होता. पोलिसांनी लवटेला अटक केली होती. त्यानंतर तो जामिनावर सुटला होता. (Crime News)

लवटे आणि संशयित शिंदेची ओळख होती. दोन जण आज सायंकाळी सातच्या सुमारास उत्तर शिवाजीनगरमध्ये एका कॅफेसमोर थांबले होते. साडेसातच्या सुमारास दोघांमध्ये बोलणे सुरू असतानाच वाद सुरू झाला. तेव्हा शिंदेने स्वत:जवळ असलेल्या धारदार शस्त्राने लवटेवर वार करण्यास सुरुवात केली. लवटेच्या पोटात, मांडीवर, पाठीवर तसेच पार्श्र्वभागावर वार केले. तसेच, डोळ्याजवळही एक वार केला. वार चुकवताना हातावरही जखम झाली. हा प्रकार पाहणाऱ्यांची पळापळ झाली.

जखमी लवटे याला तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. लवटेचा खून झाल्याची माहिती मिळताच त्याचे मित्र आणि ओळखीचे अनेक जण ‘सिव्हिल’मध्ये जमले होते. विश्रामबाग पोलिसांनी हल्ल्यानंतर तातडीने तपासाची चक्रे फिरवली. हल्लेखोर शिंदेला ताब्यात घेण्यात आले. विश्रामबागचे पोलिस निरीक्षक कल्लाप्पा पुजारी, सहायक निरीक्षक सिकंदर वर्धन आदींसह विश्रामबाग गुन्हे प्रकटीकरणच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली. पथकाने शिंदेची चौकशी केली. प्राथमिक तपासात वादातून खून केल्याचे स्पष्ट झाले.

संशयित रेकॉर्डवरील गुन्हेगार

संशयित योगेश शिंदे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. २०१८ मध्ये त्याला जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले होते.

स्टेटस्‌ची चर्चा

मृत नवनाथने त्याच्या व्हॉट्सॲप स्टेटस्‌वर ‘मोका तर मोका... सून ३०२’ असा मजकूर नमूद केला होता. लवकरच खून करणार, असा संदेश देणाऱ्या नवनाथचाच गेम झाल्याची चर्चा होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: दुसरी पत्रकार परिषद घेऊन राहुल गांधींनी काय सिद्ध केलं? निवडणूक आयोगाला दिलेला अल्टिमेटम नेमका काय आहे?

Pune Encroachment : शहरातील हजारो चौरस फुटावरील अतिक्रमण हटवले

Teachers Award : १०९ शिक्षकांना राज्य शिक्षक पुरस्कार जाहीर; पुणे जिल्ह्यातील सहा शिक्षकांचा समावेश

Ayush Komkar Case : आयुषच्या खूनापुर्वी आरोपींची एकत्रित बैठक; वनराज आंदेकरची पत्नी अटकेत, पुरवणी जबाबात सोनालीचा सहभाग असल्याची माहिती

Latest Maharashtra News Updates : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT