पश्चिम महाराष्ट्र

सीताफळ पेटंटच्या लढ्याला यश 

राजाराम ल. कानतोडे

सोलापूर ः अनेक अडथळे पार करीत गोरमाळे (ता. बार्शी) येथील डॉ. नवनाथ कसपटे यांनी विकसित केलेल्या एनएमके-एक (गोल्डन) या सीताफळ वाणाला पीक वाण संरक्षण व शेतकरी हक्क कायद्यान्वये अल्पसंख्याक स्वामित्व हक्क (पेटंट) प्राप्त मिळाला आहे. 

सीताफळाच्या विक्रमी उत्पादनाबरोबरच गेले 45 वर्षे कसपटे यांनी सीताफळाचा प्रचार, प्रसार व्हावा म्हणून आयुष्य खर्ची घातले आहे. एनएमके-एक (गोल्डन) या वाणाची नोंदणी व्हावी यासाठी 2012 पासून ते प्रयत्नशील होते. कृषी विद्यापीठ, कृषी विभाग, कृषी विज्ञान केंद्र अशा विविध स्तरांवर त्यांनी प्रयत्न केले. भारत सरकारच्या कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या पीक वाण संरक्षण व शेतकरी हक्क प्राधिकरणाकडे असलेल्या फळांच्या अधिसूचित सीताफळाचे नावच नव्हते. अधिसूचित सीताफळाचे नाव घालावे म्हणून पत्रव्यवहार केला. अधिसूचित 2015 ला नाव आल्यानंतर त्यांनी पेटंटसाठी अर्ज केला. त्यानंतर 2016 मध्ये हिसारगट्टा (बंगळुर) येथील शास्त्रज्ञ डॉ. टी. शक्तीवेल व रविकुमार शर्मा यांनी कसपटे यांच्या मधुबन नर्सरीची पाहणी केली. एनएमके-एक (गोल्डन) याविषयी अहवाल तयार केला. त्यानंतर त्यांना नुकताच स्वामित्व हक्क मिळाला आहे. 

या वाणावर कृषी शास्त्रतज्ज्ञ सुधीर प्रतापसिंग यांच्या मार्गदर्शनाखाली योगे गुप्ता या विद्यार्थ्याने पीएच.डी. केली आहे. सीताफळातील एकूण कामाबद्दलच बंगळुरच्या विद्यापीठाने 2018 मध्ये मानद डॉक्‍टरेट पदवी देऊन सन्मान केला. स्वामित्व हक्क प्राप्त झाल्यामुळे या वाणाची किंवा त्याचे नाव बदलून रोपांची विक्री करणाऱ्या देशातील रोपवाटिकांवर कारवाई करण्याचा अधिकारही त्यांना मिळाला आहे. त्यांच्या परवानगीशिवाय या वाणाच्या रोपांची निर्मिती, विक्री, जाहिरात, वितरण, आयात व निर्यात कोणालाही करता येणार नाही.

कसपटे यांनी सीताफळाची बाग केल्यानंतर 1992 मध्ये अडीच किलो वजनाच्या ऍनोना-2 हे सीताफळ चर्चेचा विषय ठरले होते. त्यानंतर रोपांची मागणी होऊ लागल्यावर 1997 मध्ये मधुबन नर्सरी सुरू केली. सध्या देशातील ती सीताफळाची सर्वांत मोठी नर्सरी असल्याचे म्हटले जात आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: धक्कादायक! पुण्यात हॉस्पिटलसमोर सापडला जिवंत बॉम्ब; क्षणार्धात परिसर सील, सात तासांचा टाइमर सेट

Donald Trump: चीनमध्ये उतरताच डोनाल्ड ट्रम्प यांचा अपमान! स्वागतासाठी शी जिनपिंग गैरहजर; ड्रॅगनकडून अमेरिका-चीन संबंधांबाबत नवा संकेत?

Prateek Yadav: प्रतीक यादवच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेला पल्मोनरी थ्रोम्बोएम्बोलिझम काय? डॉक्टरला बोलावण्याचीही संधी मिळाली नाही...

RCB VS KKR LIVE: अजिंक्य रहाणेने वर्ध्याच्या पोट्ट्याला दिली पदार्पणाची कॅप... जाणून घ्या कोण आहे सौरभ दुबे? ६ फूट ५ इंच उंचीचा गोलंदाज

"नजरेत धग अन् रग..."ओळखलंत का 'रंगी'ला? १९ जूनला होतंय 'घबाडकुंड'चं दर्शन!

SCROLL FOR NEXT