Cylinder blast filling gas in school van at solapur
Cylinder blast filling gas in school van at solapur 
पश्चिम महाराष्ट्र

स्कूल व्हॅनमध्ये गॅस भरताना सिलिंडरचा स्फोट 

सकाळवृत्तसेवा

सोलापूर : जुनी मिल कंपाउंड परिसरात घरगुती गॅस सिलिंडरमधून वाहनाच्या सिलिंडरमध्ये गॅस भरताना स्फोट होऊन स्कूल व्हॅन पेटली. ही घटना बुधवारी दुपारच्या सुमारास घडली. 

नागेश करजगी ऑर्किड स्कूलसमोर विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या व्हॅनमध्ये (एमएच 14-पी 1036) गॅस भरण्याचे काम सुरू होते. अचानक स्फोट होऊन व्हॅनला आग लागली. चालक गणेश मधुकर मोरे (वय 38, रा. हौसे वस्ती, आमराई, सोलापूर) हा जखमी झाला. चालक मोरे हा दुपारी दोन वाजता विद्यार्थी घेऊन जाण्यासाठी आला होता. शाळा सुटायच्या अगोदर तो व्हॅनमध्ये गॅस भरत होता. गॅस लिकेज झाल्याने स्फोट होऊन वाहनाने पेट घेतला. हा प्रकार लक्षात येताच शाळेतील शिपायाने तत्काळ अग्निशमन दलास कळविले. अवघ्या 10 मिनिटांत पाण्याचे बंब पोचले. व्हॅनमध्ये विद्यार्थी नसल्याने मोठा अनर्थ टळला. चालक गणेश मोरे यास उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले. 

मी मुलाला शाळेतून घ्यायला गेलो होतो. व्हॅन चालक गॅस भरत होता. अचानक स्फोट होऊन सिलिंडर लांब फेकला गेला. व्हॅनने पेट घेतला. चालकाचा हात भाजला. सोलापुरात सर्रास घरगुती गॅसचा वापर स्कूल व्हॅन, रिक्षामध्ये होत आहे. पालकांनी याचा विचार करण्याची आवश्‍यकता आहे. 
- महेश सावंत, पालक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : सायंकाळी पाच वाजेपर्यंत देशात 60.19 टक्के मतदान; महाराष्ट्रात 53.40 टक्के मतदानाची नोंद

Lok Sabha Election 2024 : EVM ची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल

Video: CSK ची प्रॅक्टिस पाहायला आलेला प्रेक्षक डॅरिल मिचेलच्या शॉटने जखमी, आयफोनही तुटला; त्यानंतर काय झालं पाहा

Latest Marathi News Live Update : आप आमदाराच्या मुलाची पेट्रोल पंप कर्मचाऱ्याला मारहाण; घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

Subodh Bhave : सुबोधचं बायकोला गोड सरप्राईज; सोशल मीडियावर होतंय कौतुक

SCROLL FOR NEXT