पश्चिम महाराष्ट्र

वैयक्तिक योजनांच्या लाभार्थींसाठी दिलासा... 'डीबीटी'ला देणार पर्याय 

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : जिल्हा परिषदेतर्फे राबविण्यात येणाऱ्या वैयक्तिक लाभाच्या योजनांमधील भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी डायरेक्‍ट बेनिफिशिअरी ट्रान्सफर (डीबीटी) प्रक्रिया सुरू केली. मात्र, या प्रक्रियेत योजना राबविण्यात अडचणी निर्माण होत असून अनेक लाभार्थींना स्वत:कडे पैसे नसल्याने उसनवारी करावी लागते आहे. तर पैसे नसल्याने अनेकजण योजनांपासून दूरच राहत असून अनेक योजनांचा कोट्यवधींचा निधी दरवर्षी खर्चही होत नाही. त्यामुळे आता डीबीटीला पर्याय देण्याचे नियोजन महाविकास आघाडीकडून सुरु आहे. 

तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने पारदर्शकता आणण्यासाठी विविध कल्याणकारी योजनांसाठी "डीबीटी' संकल्पना सुरू केली. यामुळे काही प्रमाणात पारदर्शकता आली असली तरीही योजनांवरील निधी खर्च होण्यात मोठा अडथळा आला आहे. सामाजिक न्याय विभागातील योजना राबविण्यासाठी "डीबीटी'चा मोठा अडथळा ठरत आहे. लाभार्थ्यांना प्रथम वस्तू खरेदी करून त्याचा पुरावा (पावती) सादर करावी लागते. शासकीय योजनेप्रमाणे अनुदानाप्रमाणे ती रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा केली जाते. वस्तू खरेदी करण्यासाठी लाभार्थ्यांकडे पैसे नसल्याने योजना आहे, निधीही आहे परंतु आर्थिकदृष्ट्या सक्षम लाभार्थी मिळत नसल्याची अडचण आहे. यामध्ये बदल करुन "डीबीटी'ला सक्षम पर्याय देण्याची मागणी लाभार्थींनी तीन वर्षांपासून लावून धरली आहे. या पार्श्‍वभूमीवर या प्रक्रियेला नवा पर्याय देण्याचे नियोजन शासन स्तरावरुन सुरु आहे. 

पर्याय देण्याची ठळक कारणे... 

  • लाभार्थींकडे पैसे नसल्याने अनेक लाभार्थी योजनांपासून राहत आहेत वंचित 
  • किचकट प्रक्रियेमुळे विविध योजनांचा कोट्यवधींचा निधी दरवर्षी राहतो अखर्चित 
  • मागासवर्गीय लाभार्थींकडे पैसे नसल्याने वस्तू खरेदी करता येईना 
  • सामाजिक न्याय, महिला बालकल्याण विभागाला निधी खर्च करण्यास अडचणी 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharavi Redevelopment: धारावीचा विकास सिंगापूर-हाँगकाँगच्या धर्तीवर, मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितलं प्रकल्प कधी पूर्ण होणार?

राज्यसभेच्या २६ जागांसाठी २८ उमेदवार मैदानात, भाजपनं वाढवलं काँग्रेसचं टेन्शन; दोन-तृतियांश बहुमतासाठी NDAच्या हालचाली

IND vs AFG : हार्दिक पांड्याचा फिटनेस रिपोर्ट आला समोर... वन डे मालिकेत खेळणार की नाही? रोहित शर्माचं काय?

FIFA World Cup Trophy:"१८ कॅरेट सोनं आणि ६ किलो वजन! फिफा वर्ल्ड कपच्या ट्रॉफीची किंमत किती? आकडा वाचलात का?"

Latest Marathi News Update : भारतीय अ संघासाठी ऋतुराज गायकवाडचे अर्धशतक!

SCROLL FOR NEXT