पश्चिम महाराष्ट्र

देवराष्ट्रेत विलगीकरण केंद्रात वृक्षलागवडीची चळवळ

विलगीकरण केंद्रातर्फे बरे होऊन जाणाऱ्या रुग्णांना एक झाड दिले जात आहे

स्वप्नील पवार

देवराष्ट्रे : दिवसेंदिवस पर्यावरणाचा समतोल बिघडत असून मोठ्या प्रमाणावर होत असलेली वृक्षतोड, यासाठी कारणीभूत आहे. पर्यावरणाच्या बिघडलेल्या समतोलामुळे अनियमित व अपूर्ण पर्जन्यमान, उष्णता अशा संकटांना तोंड द्यावे लागत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. रुग्णांना अधिक प्रमाणात ऑक्सिजनची गरज भासत असताना ऑक्सिजनचा होणारा तुडवडा यामुळे ऑक्सिजनचे महत्व पुन्हा अधोरेखित झाले आहे.

वातावरणातील ऑक्सिजनचे प्रमाण वाढावे. यावर प्रभावीपणे मात करायची असल्यास काळाची गरज ओळखून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण व त्याचे संवर्धन करणे आवश्यक आहे. यासाठी देवराष्ट्रे येथील यशवंतराव चव्हाण संस्थात्मक विलगीकरण केंद्रातर्फे बरे होऊन जाणाऱ्या रुग्णांना एक झाड दिले जात आहे. या विलगीकरण केंद्राने वृक्षलागवड चळवळ हाती घेतली आहे.

महाराष्ट्राचे शिल्पकार स्व. यशवंतरावजी चव्हाण यांच्या जन्मभूमीत लोकसहभागातून येथे संस्थात्मक विलागीकरण केंद्र सुरू केले आहे. कोरोना सेंटरमधूनही वृक्ष लागवड चळवळ सुरू करता येते हे विलगीकरण केंद्राने दाखवून दिले आहे. झाडे आपला श्वास आहे, त्यांचे संवर्धन झाले पाहिजे असा संदेश या कोरोना केअर सेंटरमधून दिला जात आहे. कोरोना रुग्णांना या केंद्रात झाडांचे महत्व सांगितले जात आहे. वृक्षलागवड या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

रुग्णांना वाचण्यासाठी पेपर, रोज सकाळी काढा, नाष्टा उकडलेलीअंडी, सकाळी दुपारचे शाकाहारी जेवण, दुपारी चिकन सूप, फळे, रात्री मांसाहारी जेवण, अंघोळीसाठी गरम पाणी, दिवसातून तीन वेळा गावातील खासगी डॉक्टरांचे चेकअप, आशा महिला, परिचारिका ऑक्सिजन चेकअप आदी सुविधा येथील विलगिकरणात दिल्या जातात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Property Tax: पुणे महानगरपालिकेत भाजपने करमाफीचा शब्द फिरवला; ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना टॅक्स माफी नाही

Gas Cylinder Shortage : छत्रपती संभाजीनगर तालुक्यात ग्रामीण भागात गॅस टंचाई; लग्नसमारंभ व हॉटेल व्यवसाय अडचणीत, अनेक हाँटेल गॅसअभावी बंद

Latest Marathi News Live Update: श्रीनगरच्या मालपोरा भागात दोन निवासी घरांना आग लागली

Theur Fraud News : लँड डेव्हलपरला मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून १२ कोटींचा घातला गंडा

Pachod News : केकत जळगाव येथे कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने संपविले जीवन

SCROLL FOR NEXT