narayan_patil_tanaji_sawant 
पश्चिम महाराष्ट्र

जिल्ह्यात सेनेचे आमदार वाढवणाऱ्या सावंत सरांना मंत्रिमंडळात स्थान कसं नाही?

अण्णा काळे

करमाळा : प्रा. तानाजी सावंत शिवसेनेतील फार मोठे नेते आहेत. त्यांना मंत्रिमंडळातून कसं काय डावललं? अहो, त्यांनी सोलापूर जिल्हा व संपूर्ण राज्यात शिवसेना वाढीसाठी जिवाचं रान केलंय, सर्व कट्टर शिवसैनिकांना विधानसभेत उमेदवाऱ्या दिल्या, त्यांच्यामुळे सेनेच्या आमदारांची संख्याही वाढली, तरीही त्यांना मंत्रिमंडळात स्थान नाही? हा तर सोलापूर जिल्ह्यासह महाराष्ट्रातील खऱ्या शिवसैनिकांवर मोठा अन्याय आहे, अशी उपरोधिक प्रतिक्रिया शिवसेनेचे करमाळ्याचे माजी आमदार नारायण पाटील यांनी दिली.

पाटील यांची उमेदवारी कापणे चुकीचे होते
विधानसभा निवडणुकीच्या वेळी शिवसेनेचे विद्यमान आमदार असतानाही नारायण पाटील यांची उमेदवारी कापण्यासाठी तानाजी सावंत यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली होती. सावंत यांनी नारायण पाटील यांना डावलून राष्ट्रवादीतून शिवसेनेत घेतलेल्या रश्‍मी बागल यांना उमेदवारी दिली. अपक्ष लढूनही नारायण पाटील यांनी शिवसेनेच्या रश्‍मी बागल यांच्यापेक्षा 20 हजार मते जास्त मिळवली. शिवसेनेने नारायण पाटील यांची उमेदवारी कापणे चुकीचे होते, हे सुरवातीपासून अनेकजण सांगत होते आणि निकालानंतर ते स्पष्टही झाले. या सर्व गोष्टी करण्याचा ठपका तानाजी सावंत यांच्यावर आहे.

... तर तानाजी सावंत मंत्रिमंडळात दिसले असते
आजच्या मंत्रिमंडळ विस्तारात तानाजी सावंत यांना डावलण्यात आल्यानंतर नारायण पाटील हे "सकाळ'शी बोलत होते. श्री. पाटील म्हणाले, मी शिवसेनेचा आमदार म्हणून पाच वर्षे प्रामाणिकपणे काम केले; तरीही मला डावलण्यात आले. हे सर्व कुणी केले, हे संपूर्ण जिल्ह्यातील नव्हे तर राज्यातील शिवसैनिकही सांगत आहेत. आज मी जर आमदार असतो तर सावंत सरांना मंत्री करण्यासाठी आपण पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे निश्‍चितपणे विनंती केली असती. नारायण पाटील आमदार असते तर तानाजी सावंत आज मंत्रिमंडळात दिसले असते.

सोशल मीडियावर सावंतांची खिल्ली
मंत्रिमंडळाच्या यादीतून तानाजी सावंत यांना वगळण्यात आल्याचे समजताच "आज शिवसेना जिंकली आणि खेकडा हरला', "जैसी करनी, वैसी भरनी', "भगवान के घर देर है लेकिन अंधेर नही' असे मेसेज सोशल मीडियातून फिरत आहेत. तसेच, "नारायण पाटील यांची उमेदवारी डावलल्याचे पाप सावंत यांनी केले म्हणूनच नियतीने सावंत यांना त्यांची जागा दाखवली' असेही मेसेज फिरत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! रेशन दुकानातून आता मिळणार मोफत ज्वारी; बुलडाण्यावरून आली ज्वारी; पूरग्रस्तांना दिवाळीसाठी गहू-तांदळासोबत फक्त तीन किलो तूरडाळ

Eknath Shinde: ‘महायुती’च्‍या विजयाचा ‘आघाडी’ला विश्‍‍वास: उपमुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे; महाकन्‍फ्‍यूज झाल्‍याने विरोधकांच्‍या पायाखालची वाळू सरकली

Solapur-Mumbai Flight : सोलापूर-मुंबई विमानसेवेचा शुभारंभ, औद्योगिक विकासाला गती

आजचे पंचांग आणि दिनविशेष -16 ऑक्टोबर 2025

अग्रलेख : शस्त्रांची शरणागती!

SCROLL FOR NEXT