Don't bullet train; Provide drinking water: Tanpure
Don't bullet train; Provide drinking water: Tanpure 
पश्चिम महाराष्ट्र

बुलेट ट्रेन नको; पिण्याचे पाणी द्या : तनपुरे 

विलास कुलकर्णी

राहुरी : ""नळ पाणीपुरवठा योजनेद्वारे शहरातील नागरिकांना रोज माणशी 135 लिटर आणि ग्रामीण भागातील नागरिकांना 45 लिटर पाणीपुरवठ्याची तरतूद आहे. सर्वांना सारखेच पाणी लागते; मग ग्रामीण भागावर अन्याय कशाला? शहर व ग्रामीण पाणीपुरवठ्यात तफावत कशासाठी? आम्हाला बुलेट ट्रेन नको. आमच्या ग्रामीण भागातील नागरिकांना रोज अर्धा तास पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे,'' अशा शब्दांत ग्रामीण भागातील पाणीप्रश्नावर आमदार प्राजक्त तनपुरे यांनी कारकिर्दीतील पहिल्याच प्रश्नावर विधानसभेत आवाज उठविला. 

नागपूर येथे सुरू असलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात आज महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील कर्मचाऱ्यांच्या वेतनावरील पूरक मागणीवरील चर्चेत आमदार तनपुरे यांनी भाग घेतला. त्या वेळी राहुरी मतदारसंघातील मिरी-तिसगाव पाणीयोजनेबाबत ते म्हणाले, ""योजनेद्वारे शेवटच्या गावातील घरांमध्ये अवघे 25 ते 30 टक्के पाणी पोचते. योजनेच्या जलशुद्धीकरण केंद्रात ताशी साडेतीन लाख लिटर पाणी येणे अपेक्षित आहे. ते फक्त दीड लाख लिटर येते. शेवटच्या गावापर्यंत पाणी पोचण्यासाठी रोज पस्तीस लाख लिटर पाणी योजनेला मिळाले पाहिजे. प्रत्यक्षात अडीच ते तीन लाख लिटर पाणी मिळते. योजना चालविण्यासाठी समिती असली, तरी योजनेची मालकी जिल्हा परिषदेची आहे. योजनेच्या जलवाहिनीची गळती व पाणीचोरी बंद झाली पाहिजे. योजनेचे उत्तरदायित्व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे आहे. पाणीपुरवठामंत्र्यांनी जबाबदारी निश्‍चित करावी.'' 

कुरणवाडीसह 19 गावे पाणीयोजना करताना जीवन प्राधिकरण विभागाने जलशुद्धीकरण केंद्र व जलकुंभांची जमीनखरेदीची प्रक्रिया केली नाही. त्यामुळे या जमिनीचा मालक जागेवर हक्क दाखवतो. तेथे कोणी यावे, कोणी येऊ नये, हे तोच ठरवितो. योजना चालविणाऱ्या व्यक्तीने योजनेला पाणी कधी सोडायचे, कधी सोडायचे नाही, हेही तोच ठरवितो. जीवन प्राधिकरणाच्या अनागोंदी कारभाराचा फटका योजनेला बसत आहे, याकडे आमदार तनपुरे यांनी विधानसभेचे लक्ष वेधले. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Israel Hamas War : रमजानमध्ये संदेशवाहक पाठवून युद्ध थांबले, इस्राईल-हमास युद्धावर पंतप्रधान मोदींचं मोठं वक्तव्य

Latest Marathi News Live Update : उद्या जर बिभव स्वतः आले नाहीत तर...स्वाती मालीवाल प्रकरणात महिला आयोग आक्रमक!

खासदारांच्या दिलदार मित्रानेच चंद्रहार पाटलांचा बळी दिला; विशाल पाटलांनी कोणावर केला गंभीर आरोप

Dry Day: मायानगरीचा विकेंड कोरडाच! मुंबई आणि परिसरात 3 दिवस ड्राय डे, काय आहे कारण?

नळातून किंवा शॉवरमधून पाणी येत नसेल तर घरच्या घरी 'असे' करा दुरुस्त

SCROLL FOR NEXT