Dr. Babasaheb Ambedkar Arch controversy esakal
पश्चिम महाराष्ट्र

डॉ. आंबेडकरांच्या नावाची कमान पाडल्याप्रकरणी बेडगच्या सरपंच, उपसरपंचासह सदस्यांना न्यायालयाचा मोठा दिलासा; काय आहे प्रकरण?

सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांवर दाखल करण्यात आला होता ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा

सकाळ डिजिटल टीम

स्वागत कमान पडल्याप्रकरणी उपमुख्यमंत्री, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते.

आरग : बेडग येथील स्वागत कमान (Dr. Babasaheb Ambedkar Arch controversy) पाडल्या प्रकरणी सरपंच उमेश शंकराव पाटील आणि उपसरपंच मल्हारी उर्फ संभाजी आप्पासाहेब नागरगोजे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्यांना सांगली जिल्हा सत्र न्यायालयाकडून (Sangli Court) मोठा दिलासा मिळाला आहे.

जिल्हा सत्र न्यायालयाने त्यांचा जामीन मंजूर केला आहे, अशी माहिती वकील प्रतीक जाधव यांनी दिली. दरम्यान, या प्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयात गुरुवारी जामीन अर्जावर सुनावणी झाली. न्यायालयाने त्यांचा जामीन मंजूर केला. यावेळी वकील प्रकाश जाधव व प्रतीक जाधव यांनी त्यांची बाजू मांडली.

त्यामुळे न्यायालयाकडून त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. बेडग येथील स्वागत कमान पडल्याप्रकरणी उपमुख्यमंत्री, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. अनुसरून सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांवर ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

यावेळी गावातील ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर गुन्हे मागे घेण्यासाठी मोर्चा काढला होता. यावेळी जिल्हा प्रशासनाने यावर तोडगा काढण्यासाठी आंबेडकरी समुदाय व गावातील ग्रामस्थांची जिल्हा परिषदेत सुनावणी आयोजित केली होती.

दोन्ही गटाची बाजू प्रशासनाने ऐकून घेतली. तसेच गुरुवारी (ता. १०) रोजी जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी सरपंच उपसरपंच सदस्यांचा जामीन मंजूर करण्यात आला. त्यामुळे गावातील ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT