पश्चिम महाराष्ट्र

सततच्या धुक्यामुळे पिकांवर परिणाम ; शेतकरी चिंतेत

रुपेश कदम

दहिवडी (जि. सातारा) : आज (शुक्रवार) पहाटेपासूनच दहिवडीसह माण तालुक्यातील बहुतांशी परिसर धुक्याच्या चादरीत हरवून गेला. तर थंडीच्या लाटेने सर्वांना हुडहुडी भरली. वातावरण आल्हादायक असले तरी पिकांवर होणारा विपरित परिणामामुळे शेतकर्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.
 

सध्या वातावरणात होत असलेल्या सततच्या बदलामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पहाटे पासून सकाळ पर्यंत हुडहुडी भरवणारी थंडी असते. तर त्यानंतर उन्हाचा तडाखा सुरु होतो. सायंकाळच्या सुमारास ढग दाटून येतात. मोठ्या प्रमाणात दव पडते. अधूनमधून धुक्याची गडद चादर सर्व व्यापून टाकते.

जरुर वाचा - Video : हुतात्मा संदीप सावंत यांच्या आठवणीने विजय दिवस चाैक गहिवरला

आजही (शुक्रवार) पहाटेपासूनच थंडीत कमालीची वाढ झालेली होती. त्यातच संपुर्ण परिसर धुक्याच्या दाट चादरीत हरवून गेला होता. काही फुट अंतरावरील दिसणं सुध्दा अवघड झालं होतं. त्यातच थंडगार हवेसोबत थंडीच्या लाटावर लाटा येत होत्या. त्यामुळे थंडीची तीव्रता कमालीची वाढली होती. सकाळच्या वेळी नित्यनियमाची शेती वा जनावरांची करावयाची कामे करण्यासाठी सुध्दा बाहेर पडण्यासाठी शेतकरी अनुत्सुक दिसत होते. अशा वातावरणातही शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची मात्र लगबग सुरु होती. वाहने मात्र लाईट लावूनच ये-जा करताना दिसत होती.


हेही वाचा : Video : चला फ्लेमिंगोसह रंगबेरंगी पक्षी निरीक्षणासाठी

या विचित्र वातावरणाचा शेतीवर मात्र अत्यंत विपरित परिणाम होणार आहे. कांद्यावर बुरशी व करपा, वाटाण्यावर बुरशी व कीड, गव्हावर तांबेरा, ज्वारीवर चिकटा आदी रोगांसह कीडींचा, अळीचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. यंदा निसर्गाच्या लहरीपणामुळे अगोदरच मेटाकुटीस आलेल्या शेतकर्यांचे यामुळे कंबरडे मोडण्याची शक्यता आहे. किटकनाशक, तणनाशक फवारुन शेतकरी दमून गेले आहेत. या सर्व परिस्थितीमुळे शेतकर्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीस सामोरे जावे लागत आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market AI Rules: शेअर बाजारात AI च्या मदतीने ट्रेडिंग करताय? थांबा! गुंतवणुकीबाबत SEBIचा मोठा इशारा; जाणून घ्या नवे नियम

Koyna Dam Water level Update : महाबळेश्वर, नवजा अन् कोयनेत दमदार हजेरी; गेल्या 12 तासांत 'इतक्या' मिमी पावसाची नोंद, धरणाची स्थिती काय?

Latest Marathi News Live Update : उत्तराखंडमध्ये पावसाचा तडाखा; बद्रीनाथ मार्गावर दरड कोसळून महाराष्ट्रातील भाविक अडकले

'वॉर्नरलाही जेजुरीचा भंडारा लावला होता' देवदत्त नागेने सांगितला परदेशातील भन्नाट किस्सा

Kolhapur ACB Trap : शाहूवाडीत PWD च्या शाखा अभियंत्याला 38 हजारांची लाच घेताना रंगेहात अटक; 'या' कामाच्या बिलासाठी मागितली होती रक्कम

SCROLL FOR NEXT