Due to the hard work of the teachers the quality of the school remained 
पश्चिम महाराष्ट्र

शिक्षकांच्या कष्टामुळे शाळांचा दर्जा टिकून 

सकाळ वृत्तसेवा

नगर : ""जिल्हा परिषदेच्या शाळांची गुणवत्ता उत्कृष्ट आहे. शिक्षकांनी कष्ट घेतल्यास शाळांचा दर्जा आणखी उंचावेल,'' असे प्रतिपादन आदर्श गाव संकल्प व प्रकल्प समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांनी केले. 

जिल्हा गुरुकुल शिक्षक मंडळ, प्राथमिक शिक्षक समिती, गुरुकुल सांस्कृतिक समिती, गुरुकुल महिला आघाडी, उर्दू शिक्षक, मुख्याध्यापक, पदवीधर शिक्षक समिती यांच्या वतीने आयोजित शिक्षक साहित्य संमेलनाच्या समारोपप्रसंगी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. या प्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, शिक्षण उपसंचालक दिनकर टेमकर, उपशिक्षणाधिकारी अरुण धामणे, शिक्षक नेते संजय कळमकर, संजय धामणे, रा. या. औटी, नितीन काकडे आदी उपस्थित होते. 

या प्रसंगी जिल्ह्यातील 28 शाळांना "गुरुकुल उपक्रमशील शाळा' पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच, वाबळेवाडी (ता. शिरूर, जि. पुणे) व जरेवाडी (ता. पाटोदे, जि. बीड) या शाळांनी आज यशोगाथा सादर केली. या वेळी या दोन्ही शाळांचाही सन्मान करण्यात आला. 

पवार म्हणाले, ""सहकार सभागृहात शिक्षकांचा कार्यक्रम आनंदात होतो, ही गोष्ट आनंदाची आहे. गुरुकुल मंडळाने हा कार्यक्रम घेऊन एक चांगला आदर्श निर्माण केला आहे. जिल्हा परिषद शाळेच्या माध्यमातून हिवरेबाजारमधील आजचे सर्व उपक्रम उभे राहिले आहेत. त्यामुळे शिक्षकांनी अन्य उपक्रम राबविणे गरजेचे आहे.'' 
कळमकर म्हणाले, ""आपल्याकडील एखादी शाळा "आयडॉल' होण्यासाठी प्रत्येकाने जरेवाडी व वाबळेवाडी शाळांचा आदर्श घ्यावा. हा पुरस्कार या आदर्श शाळांना म्हणूनच देण्यात आला आहे. शाबासकीची थाप मिळावी म्हणून हे पुरस्कार देण्यात येत आहेत. शिक्षकांच्या दृष्टीने आजचा दिवस अविस्मरणीय आहे.'' 

"अतिरिक्त'मुळे हशा आणि हसे 
अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर यांचे नाव घेताना "अतिरिक्त' हा शब्द टाळून उपमुख्य कार्यकारी अधिकारी असा करण्यात आला. त्यावरून भोर यांनी आपल्या भाषणात "अतिरिक्त' शब्दावर भर दिल्याने सभागृहात एकच हशा पिकला. त्यानंतर पोपटराव पवार यांनीही "अतिरिक्त' हाच शब्द आपल्या भाषणात वापरून सभागृहात हशा कायम ठेवला. अतिरिक्त कामामुळे शिक्षणाचे हसे झाल्याने ही खसखस पिकली. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SA, T20I: जसप्रीत बुमराह अचानक घरी गेला, पुढच्या दोन टी२० सामन्यात खेळणार की नाही? BCCI ने दिले अपडेट

३० हजार फूट उंचीवर मृत्यूशी झुंज! इंडिगो विमानात घडलेला तो थरारक क्षण! कोल्हापूरकर डॉक्टर बनल्या 'देवदूत'

चाकूने गळा चिरून महिलेची हत्या; अहिल्यानगर जिल्हा हादरला, नवऱ्याचे शेजारच्यांना फाेन, दरवाजा उघडला अन् धक्काच बसला..

'नगर तालुक्यातील कांदा व्यापाऱ्याची ८२ लाखांची फसवणूक'; अनेक दिवस कांदा खरेदी-विक्रीचा व्यवहार झाला अन्..

दुर्दैवी घटना! 'बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकल्याचा मृत्यू'; संगमनेर तालुक्यातील घटना, आईचा काळीज पिळवटणारा आक्राेश, अंगणात खेळत हाेता अन्..

SCROLL FOR NEXT