farmar 
पश्चिम महाराष्ट्र

संकटातही पट्ट्याने शोधली उत्पनाची वाट

सकाळ वृत्तसेवा

बिजवडी (जि, सातारा) : सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाउन आणि संचारबंदी लागू करण्यात आली आहे. अनेक बाजारपेठा बंद असल्याने त्याचा सर्वात जास्त फटका बळीराजाला बसला आहे. भाजीपाला उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात असतानाच वावरहिरे (ता. माण) येथील प्रगतशील शेतकरी अर्जुन अवघडे यांनी सात गुंठे क्षेत्रातील वांग्यातून हजारो रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे. 

वावरहिरेत अर्जुन अवघडेंनी सात गुंठे शेतीत वाग्यांची लागवड केली. त्यासाठी त्यांनी सुरवातीला सात गुंठ्यांत पाच बाय सात अंतरावर बैलजोडीच्या साहाय्याने सरी पाडल्या. त्यात प्रत्येकी पाच फुटांवर वांग्यांची रोपे लावली. सुरुवातीला गिऱ्हाईकच नसल्याने वांग्याचा पहिला तोडा बांधावरच फेकून द्यावा लागला होता. त्यातून अनेक जण आर्थिक संकटात गेले. मात्र, अवघडेंनी हताश न होता चांगले लक्ष देत वांगी जोमदार आणली. लॉकडाउनची तीव्रता वाढत गेल्याने नागरिकांना भाजीपालाही कोठेच मिळेना, अशी परिस्थिती झाली. मग या वांग्याला चांगले दिवस आले. माफक दरात जागेवरच वांगी नेण्यासाठी गिऱ्हाईक येऊ लागले. त्यातून त्यांना चांगले उत्पन्न मिळाले. 

कोरोनामुळे भाजीपाला व्यवसायावर कुऱ्हाड कोसळली होती. सध्या लॉकडाउनमुळे परिसरातील दहिवडी, वावरहिरे, बिजवडी, शिंगणापूर आदी आठवडा बाजार बंद असल्याने परिसरातील अनेक ग्राहक सध्या शेतातच येऊन वांगी विकत घेत आहेत. 40 ते 50 रुपये प्रती किलो दराने विक्री होत आहे. यापुढेही अजून दोन महिने वांग्याचे उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे. त्यातून त्यांना 25 ते 30 हजार रुपये उत्पन्न मिळण्याची शक्‍यता दिसते. इतर शेतकऱ्यांनी अशा पीक पद्धतीचा अवलंब करून कमी क्षेत्रात, कमी खर्चात जास्त उत्पन्न घेणाऱ्या भाजीपाल्याची लागवड केल्यास शेतीतून चांगले उत्पन्न मिळू शकते. कोरोनामुळे निर्माण झालेल्या आणीबाणीच्या परिस्थितीत वांग्याची यशस्वी लागवड करून अवघडेंनी शेतकऱ्यांसमोर नवा आदर्श उभा केला आहे. 


शेतकऱ्याच्या मालाला व्यापारी भाव देत नाहीत म्हणून ओरड करण्यापेक्षा आपल्या पिकाची आपणच विक्री केल्यास त्यांचा शेतकऱ्याला जास्त फायदा होऊ शकतो. आपण पिकवलेला माल आपणच विकला तर जास्तीचे पैसे मिळतात. 

- अर्जुन अवघडे, प्रगतशील शेतकरी, वावरहिरे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis: ''काहींना यात राजकारण करायचंय'', मराठा आरक्षणाच्या 'जीआर'वरुन मुख्यमंत्र्यांनी ओबीसी नेत्यांचे कान टोचले

Latest Marathi News Updates Live : प्रतिज्ञापत्रावरुन मराठ्यांना ओबीसीत टाकता येणार नाही - छगन भुजबळ

Explained: लहान मुलांची रोगप्रतिकारशक्ती कमी असल्यास कोणती लक्षणे दिसतात अन् कोणते उपाय करावे? वाचा आयुर्वेद तज्ज्ञांचे मत

Nagpur News: नागपूरमधील यशवंतराव चव्हाण कॉलेजमध्ये विद्यार्थ्याने संपवले जीवन; मानसिक ताणाच्या मुद्द्यांवर चिंता व्यक्त

Income Tax Law: आता २० हजारांपेक्षा जास्त रोख रकमेचा व्यवहार महागात पडणार, आयकर विभागाचा नवीन नियम तुम्ही वाचलात का?

SCROLL FOR NEXT