पश्चिम महाराष्ट्र

पुरग्रस्तांच्या मदतीसाठी घोषणा नको, तर जीआर काढा  

सकाळ वृत्तसेवा

सांगली - पूरग्रस्तांसह अतिवृष्टीत पीक गेलेल्या शेतकऱ्यांची किमान दोन हेक्‍टरवरील कर्जमाफी करावी. वीज पंपाची बिले माफ करावीत. कर्जमाफीसह विविध घोषणा झाल्या आहेत. याबाबत तातडीने शासन निर्णय (जीआर) काढावेत आणि निवडणुकीपूर्वी त्यांची अंमलबजावणी करावी. विधानसभेची निवडणुकही पुढे ढकलून सर्वांना मदत द्यावी, अशी मागणी स्वाभिमानीचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी आज पत्रकार परिषदेत केली. ते म्हणाले,"" पूरग्रस्तांच्या विविध मागण्यांसाठी 31 ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल.

शेट्टी म्हणाले,"" नुकताच आलेला महापूर हा निसर्गाबरोबरच मानवनिर्मित म्हणावा लागेल. महाराष्ट्र, कर्नाटक राज्यात याबाबत समन्वयाचा अभाव होते. हे अनेकदा स्पष्ट झाले. मुख्यमंत्र्यांनी कोल्हापूरात आल्यानंतर अलमट्टीतून 5 लाख 30 हजार क्युसेक विसर्ग सांगितला. त्यावेळी प्रत्यक्षात 3 लाख 65 हजार इतका विसर्ग होता. त्यासाठी महाराष्ट्र, कर्नाटकातील कृष्णा नदी व उपनद्यांच्या जलाशयाच्या विसर्गाचे नियमन केंद्रीय जल आयोगामार्फत करावे.

सांगली - कोल्हापूर जिल्ह्यांना 2500 हजार कोटीचे पॅकेज देवून राष्ट्रीय आपत्ती जाहीर करावी. सांगली जिल्ह्यातील 30 हजार हेक्‍टरवरील ऊस कुजला आहे. याची नुकसानभरपाई म्हणून शासनाने कर्जमाफी दोन हेक्‍टरपर्यंत द्यावी. त्याचवेळी दोन वर्षापूर्वीच्या कर्जमाफीची रक्कम अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाली नाही.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी...
0 उसाला एकरी 2 लाख नुकसान भरपाई द्या.
0 शेती कामे रोहयोतून करायला परवानगी द्यावी.
0 घर बांधणीसाठी 5 लाख द्यावेत.
0 महापूर राष्ट्रीय आपत्ती जाहीर करावी.
0 वीजपंपाचे बिल माफ करावे.
0 गाय, म्हैस मृत्यू प्रकरणी 50 हजार नुकसानभरपाई द्यावी.
0 पडलेल्या विहिरींना 50 हजार रुपये मिळावेत.
0 खराब मिटर, रोहित्र, पोलची तातडीने दुरुस्ती व्हावी.
0 महापालिकेने एक वर्षाची घरपट्टी, पाणीपट्टी माफ करावी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT