पश्चिम महाराष्ट्र

सोलापूरच्या नूतन महापौरांची आज परीक्षा 

विजयकुमार सोनवणे

सोलापूर ः महापौर निवडीनंतर आज (शुक्रवार) महापालिकेची पहिली सभा होत आहे. महापौर निवडीच्या वेळी झालेल्या घडामोडींच्या पार्श्‍वभूमीवर ही सभा महापौर श्रीकांचना यन्नम यांच्यासाठी परीक्षा असणार आहे. 

भाजपचे गट एकत्रित आले 
राज्यात सत्तांतर झाले आणि त्या पार्श्‍वभूमीवर महापालिकेतही मोठ्या हालचाली झाल्या. भाजपला महापौरपदापासून दूर ठेवण्यासाठी महाविकास आघाडीचा प्रयत्न झाला, मात्र तो अयशस्वी झाला. महापौरपदावर भाजपचाच उमेदवार विजयी झाला पाहिजे यासाठी भाजपमधील सर्व गट एकत्रित आले. उपमहापौर निवडीच्या वेळी पेच निर्माण झाला, महापौरपदावेळी तटस्थ भूमिका घेणाऱ्या शिवसेनेने उपमहापौर निवडीवेळी कॉंग्रेसला मदत केली. मात्र, तरीही महाविकास आघाडीचा उमेदवार विजयी होऊ शकला नाही. 

विषयपत्रिकेतील प्रस्तावांवरून होऊ शकतात मतभेद 
महापौर व उपमहापौर निवडीच्या वेळी भाजपचे सर्व गट एकत्रित आले तरी विषयपत्रिकेवरील काही प्रस्तावांवर त्यांचे मतभेद होऊ शकतात. त्यातच सध्या माता रमाई यांच्या पुतळ्यासंदर्भात वाद निर्माण झाला आहे. डॉ. आंबेडकर स्मारकासाठी महापालिका शाळेची जागा देण्याच्या प्रस्तावावरून असाच वाद निर्माण झाला आहे. या प्रस्तावाबाबत भाजपचे नेते काय निर्णय घेतात, त्यावरून सभागृहाचे कामकाज कसे सुरू राहील, हे स्पष्ट होणार आहे. 

कॉंग्रेस व शिवसेनेच्या भूमिकेकडे लक्ष 
महापौर व उपमहापौर निवडीच्या वेळी महाविकास आघाडी एकत्रित आणण्याचा प्रयत्न झाला असला, तरी सभेदरम्यान कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस व शिवसेना एकत्रित येणार का, हेही या सभेत स्पष्ट होणार आहे. राज्याच्या राजकारणात हे तिन्ही पक्ष एकत्रित आहेत, त्याचे प्रतिबिंब महापालिका सभेत दिसणार आहे का, याबाबतही उत्सुकता निर्माण झाली आहे. सध्या विधानसभेतील कामकाज आरोप-प्रत्यारोपांमुळे तापले आहे, अशा स्थितीत महापालिकेचे कामकाज शांततेत व व्यवस्थित चालविण्याची कसरत महापौरांना करावी लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chandrakant Patil : 'शरद पवार गट सोबत आला तर विचार करू'; चंद्रकांत पाटलांचे मोठे विधान, काँग्रेसला डावलून 'महायुती'चा सत्तेसाठी नवा फॉर्म्युला!

Earth : पृथ्वीच्या खाली आहे अदृश्य ढाल; जी सगळ्या संकटांपासून आपल्याला ठेवते दूर, नव्या संशोधनातून रहस्यमय खुलासा, पाहा सविस्तर

Viral Video: पहिल्यांदाच ब्लिंकिटवर ऑर्डर! काकूंची प्रतिक्रिया पाहून नेटकरी झाले फिदा, व्हिडिओ व्हायरल

Kolhapur crime news : इचलकरंजी पोलिसांनी घरफोड्या उघडकीस आणल्या पण एसपींनी पोलिसांचीच चौकशी लावली

Russia–US New START Expiry Explained: भयानक इशारा! रशिया–अमेरिका अणु करार संपला, जग पुन्हा न्यूक्लिअर धोक्याच्या उंबरठ्यावर

SCROLL FOR NEXT