uddhav thackeray 
पश्चिम महाराष्ट्र

फडणवीसांची कर्जमाफी किचकट तर ठाकरेंची सुटसुटीत 

प्रमोद बोडके

सोलापूर : सीएससी सेंटरवर रात्री-बेरात्री जोडीने जाणारे शेतकरी नवरा-बायको, ग्रीन, यलो, रेड अशा अनेक याद्यांमध्ये आपली नावे शोधणारे लाभार्थी, तीन वर्षे झाले तरीही कर्जमाफीच्या लाभापासून वंचित असलेले शेतकरी अशा किचकट अटी व लांबलचक प्रक्रिया जुन्या कर्जमाफीच्या योजनेत होती. नव्या कर्जमाफी योजनेत या सर्व प्रक्रियांना फाटा देण्यात आला असून पारदर्शकतेसोबतच कमी वेळेत कर्जमाफी योजना पूर्ण करण्याचा निर्णय राज्यातील महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेच्या तुलनेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची कर्जमाफी योजना सुटसुटीत असल्याचे दिसत आहे. 
हेही वाचा : अण्णा हजारे यांचे पुन्हा पंतप्रधानांना पत्र 
शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यासाठी या नव्या योजनेत आधारकार्ड महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.ज्या शेतकऱ्यांकडे आधारकार्ड नाही अशा शेतकऱ्यांचे आधारकार्ड काढण्याचीही मोहीम येत्या काळात राबविली जाणार आहे. जानेवारी अखेरपर्यंत लाभार्थी शेतकऱ्यांच्या याद्या अंतिम केल्या जाणार आहेत. फेब्रुवारीपासून या याद्या पोर्टलवर अपलोड केल्या जाणार असून महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजना कोणत्याही स्थितीत मे अखेरपर्यंत पूर्णपणे राबविण्याचा निर्धार महाविकास आघाडीच्या सरकारने घेतला आहे. नव्या योजनेची संपूर्णतः: जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली असून या योजनेसाठी महसूल, कृषी व सहकार विभागाची तिहेरी यंत्रणा काम करत आहे. 
हेही वाचा : ...म्हणून राहुरीला मंत्रीपद दिले 
जुन्या कर्जमाफी योजनेत सरकारने सहकार विभाग व बॅंकांकडून तब्बल 75 कॉलममध्ये माहिती मागितली होती. ही माहिती भरतानाच प्रशासकीय यंत्रणा दमून गेली होती. नव्या योजनेत मात्र सरकारने फक्त 28 कॉलममध्ये शेतकऱ्यांची माहिती मागितली आहे. जुन्या कर्जमाफीच्या जाचक अटी व किचकट प्रक्रियेमुळे भाजपला या योजनेतून लाभ होण्या ऐवजी प्रशासकीय यंत्रणा व शेतकऱ्यांचा रोषच घ्यावा लागला होता. तशी स्थिती आपल्याबाबत होऊ नये यासाठी महाविकास आघाडी सरकारने काटेकोरपणे काळजी घेतली आहे. जुन्या कर्जमाफी योजनेतून सोलापूर जिल्ह्याला 751 कोटी रुपये मिळाले होते. नव्या कर्जमाफी योजनेतून जिल्ह्याला आता जवळपास 1144 कोटी रुपये मिळणार आहेत. या शिवाय नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांसाठी येणारी योजना व दोन लाखांवरील थकीत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांसाठी येणारी योजना यामध्येही सोलापूर जिल्ह्याला अधिकचा लाभ होण्याची शक्‍यता आहे. 
हेही वाचा : सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री भरणे? 

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ऑनलाइन ग्रोसरी ऑर्डर करण्याआधी सावधान! Blinkit च्या फ्रीजरमध्ये जिवंत उंदीर आढळला; स्टोअरचा व्हिडिओ व्हायरल

पेपरमध्ये ढीगभर चुका, UGC-NET परीक्षेचे तीन पेपर पुन्हा होणार, तारीखही जाहीर...

Rohit Sharma: बाप रे बाप...! सायकलवरून हजारो किमीचा प्रवास करून आलेल्या फॅनला भेटल्यावर कशी होती रोहितची रिअ‍ॅक्शन, Viral Video

Phone Charging Tips: Airplane Mode ON करून फोन चार्ज केला तर काय होतं? जाणून घ्या

Shirur Bypass Crash: शिरूर बायपासवर पुन्हा बळी; तुटलेल्या दुभाजकातून दुचाकी नेणे जीवावर बेतले

SCROLL FOR NEXT