farmer crisis sugarcane growers Cost of production is huge than FRP agriculture esakal
पश्चिम महाराष्ट्र

Sangli News : ऊस उत्पादकांत नाराजी; उत्पादन खर्च मणभर, एफआरपी वाढ कणभर

शंभर रुपयांची वाढ अन्यायकारक असल्याची भावना

सकाळ वृत्तसेवा

सांगली : केंद्र सरकारने उसाच्या रास्त आणि किफायतशीर भावात (एफआरपी) प्रतिक्विंटल १० रुपये म्हणजे टनामागे १०० रुपयांची वाढ जाहीर केली आहे. ही वाढ १०.२५ उताऱ्यासाठी आहे.

गेल्या दोन वर्षांत उत्पादन खर्चात झालेली एकरी किमान १० हजार रुपयांची मणभर वाढ पाहता एफआरपी वाढ कणभर आहे, असा संताप ऊस उत्पादक शेतकरी व्यक्त करत आहेत. किमान २५० ते ३०० रुपयांची वाढ अपेक्षित होती, असे मत जाणकारही व्यक्त करत आहेत.

ऊस उत्पादनाच्या खर्चात एकरी सरासरी दहा हजार रुपयांची वाढ झाली आहे. त्या तुलनेत ४० टन सरासरी उतारा असलेल्या जिल्ह्यात शेतकऱ्यांनी नव्या एफआरपीनुसार एकरी ४ हजार रुपये वाढ मिळणार आहे. म्हणजे, वर्षाकाठी एकरी ६ हजार रुपयांचा तोटा वाढणार आहे.

शेतमजुरीत दीडपट वाढ झाली आहे. रासायनिक खतांचे खर्च सरासरी ६ हजार रुपयांनी वाढला आहे. मशागतीच्या खर्चात सतत वाढ होत आहे.

त्याचा तुलनात्मक अभ्यास झाला आहे का, असेल तर मग तुटपुंजी वाढ का, साखरेचा दर नियंत्रणात ठेवण्यासाठी ऊस उत्पादकांवर अन्याय का, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.

तोडणीची ‘लाच’ दाखवणार कशी?

ऊस तोडायला येणारी टोळी आता एकरी किमान पाच हजार रुपयांची लाच मागत आहे. हंगाम लांबला तर ती ७ ते १० हजार होते. हा खर्च कशात धरायचा? एफआरपी ठरवणारी समिती त्याचा हिशेब करणार काय, असा संतप्त सवालही उपस्थित केला जात आहे.

‘स्वाभिमानी’ संधी साधणार?

ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये दराबाबत गेल्या काही वर्षांत स्थिरता आली होती. ऊस दरासाठीचे आंदोलन मरगळले होते. गेल्या दोन ते तीन वर्षांत खते, मजुरी, मशागतीचे दर वाढल्याने ऊसही परवडेनासा झाला आहे.

अशावेळी टनाला फक्त शंभर रुपयांची झालेली वाढ शेतकऱ्यांमध्ये नाराजी निर्माण करणारी ठरते आहे. ही संधी स्वाभिमानी शेतकरी संघटना साधणार का आणि पुन्हा एकदा एफआरपी वाढीसाठी आंदोलन उभे करणार का, याकडे आता लक्ष असेल.

माजी खासदार राजू शेट्टी यांनी ऊस दराच्या आंदोलनाची धार कमी झाल्यानंतर अन्य शेतमालाचे प्रश्‍न व देशव्यापी शेतकरी प्रश्‍नांकडे लक्ष दिले होते. आता पुन्हा एकदा ऊस दराचा प्रश्‍न ऐरणीवर येतो आहे. ऊस पट्ट्यात या टप्प्यावर काय प्रतिक्रिया उमटते, याकडे आता लक्ष असेल.

उसाच्या उत्पादन खर्चात झालेल्या वाढीच्या तुलनेत एफआरपी फक्त १०० रुपयांनी वाढवणे अन्यायकारक आहे. किमान २५० ते ३०० रुपयांची वाढ अपेक्षित होती. तरच खर्चाचा ताळमेळ जमला असता. परंतु एफआरपी ठरवणारी समिती ‘मॅन हावर्स’च्या आधारे गणित मांडते आणि तिथेच शेतकऱ्यांच्या अन्नात माती कालवली जाते.

- संजीव माने, ऊस अभ्यासक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karnataka Sugar Season : महाराष्ट्राचा ऊस पळवण्यासाठी कर्नाटक सरकारचा नवा डाव, कर्नाटकात साखर कारखाने सुरू...

IND vs AUS 1st ODI Live: २५ धावांत ३ विकेट्स! विराट कोहलीला 'गंडवलं', भोपळ्यावर माघारी पाठवलं; शुभमन गिलही परतला Video

Beed News : छातीत लागली गोळी, रस्त्याकडेला रक्ताच्या थारोळ्यात आढळला मृतदेह; बीडमध्ये खळबळ

Kolhapur Sex Worker : कोल्हापुरात एकाच वेळी सहा महिलांनी नस कापून घेतली, प्रकरणातील नवी अपडेट समोर

Diwali 2025: दिवाळीत पाण्यावरचे दिवे मुलांसाठी धोकादायक, डॉक्टरांनी नेमकं काय सांगितले?

SCROLL FOR NEXT