Accident News Esakal
पश्चिम महाराष्ट्र

Accident News: सांगलीतील विजापूर-गुहागर मार्गावर भीषण अपघात; पाच जणांचा मृत्यू

अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला तर एक जण जखमी झाला आहे

अंकिता खाणे (Ankita Khane)

सांगलीतील विजापूर-गुहागर मार्गावर भीषण अपघात झाला आहे. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तर एक जण जखमी झाला आहे. विजापूर-गुहागर राज्य मार्गावर जतपासून 5 किलोमीटर अंतरावर असलेल्या अमृतवाडी फाट्याजवळ स्विफ्टकारने समोरून येणाऱ्या ट्रकला चुकवण्यासाठी उभ्या असलेल्या डंपरला धडक दिल्यामुळे भीषण अपघात झाला. एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला आहे.

गाणगापूरवरुन दर्शन घेऊन विजयपुर मार्गे जतकडे येत असताना हा अपघात रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडला आहे. या अपघातात कार चालक दत्ता हरीबा चव्हाण (वय वर्षे 40), नामदेव पुनाप्पा सावंत (वय वर्षे 65) , पदमिनी नामदेव सावंत (वय वर्षे 60) , श्लोक आकाशदिप सावंत (वय वर्षे 8) मयुरी आकाशदिप सावंत (वय वर्षे 38) यांचा मृत्यू झाला आहे.

हे चौघे जण एकाच कुटुंबातील असुन आजी, आजोबा सून व नातू यांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात वरद सावंत हा दहा वर्षाचा मुलगा गंभीर जखमी झाला आहे.

अपघात झाला तेव्हा आई मयुरी सावंत व मुलगा वरद सावंत हे दोघेजण जखमी अवस्थेत असल्यामुळे त्यांना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. वरद यास तातडीने पुढील उपचारासाठी सांगलीला नेण्यात आले. भाड्याने कार घेऊन ते देवदर्शनासाठी गेले होते. चालक म्हणुन दत्ता चव्हाण एकाच कुटुंबातील चारजण रहिवाशी आहेत.

चार जणांचे मृतदेह जत ग्रामीण रुग्णालयात शविच्छेदनासाठी आणण्यात आले. चालक दत्ता हा जखमी होता. त्यास उपचारांसाठी नेत असताना वाटेतच मृत्यू झाला. मोठा अपघात घडल्याने बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. जत ग्रामीण रुग्णालयात देखील मोठी गर्दी झाली होती. पोलिस निरीक्षक राजेश रामआघरे यांनी तातडीने भेट देऊन घटनास्थळी भेट दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; पंढरपुरात 20 लाखाहून अधिक भाविक दाखल

Ashadhi Ekadashi : विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळालेले उगले दाम्पत्य कोण आहे? मुख्यमंत्र्यांसोबत मिळाला शासकीय महापूजेचा मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

SCROLL FOR NEXT