father arrested for giving snake in sons hand at solapur
father arrested for giving snake in sons hand at solapur  
पश्चिम महाराष्ट्र

मुलाच्या हातात दिला साप अन् वडिलांना झाली अटक

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : पाच वर्षाच्या मुलाच्या हातामध्ये दोन नाग देवून फोटो काढून सोशल मीडीयावर शेअर करणाऱ्या परशुराम शिंदे (वय 29, रा. लवंग,ता. माळशिरस) यास सोलापूर वन विभागाने अटक केली आहे. 

परशुराम शिंदे हा मुळचा लोणंद (ता. सातारा) येथील रहिवाशी आहे. तो लवंग (ता. माळशिरस) येथे पंक्‍चर काढण्याचा व्यवसाय करतो. सर्पमित्र असल्याचे सांगत तो नेहमी साप हातळत असल्याचे चौकशीत समोर आले आहे. त्याने पाच वर्षाच्या मुलाच्या हातात दोन विषारीजातीचे नाग देऊन फोटो काढले. ते फोटो फेसबुकवर अपलोड केले. हा प्रकार वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिसून आला. शिंदेचे प्राफाईल तपासून तत्काळ सातारा व माळशिरसच्या वनविभागास त्यावर कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार वनविभागाचे पथक लोणंदला पोचले. तो लवंग गावी गेल्याची माहिती मिळाली. तेथून त्यास मंगळवारी अटक करण्यात आली असून त्याच्याव वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 च्या कायद्यानुसार कोणत्याही वन्यप्राण्यास पकडणे, ठार करणे, जाळी लावून पकडणे, दुखापत करणे हा गुन्हा आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी माहिती दिल्यानंतर परशुराम शिंदे यास अटक केली आहे. नागरिकांनी साप किंवा अन्य वन्यजीवांसोबत छायाचित्रे, सेल्फी काढून सोशल मीडियावर व्हायरल करू नयेत. हा कायद्याने गुन्हा आहे. 
- पी.एच.बडगे, उप वनसंरक्षक, वन विभाग, सोलापूर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल; ईव्हीएमची केली होती पूजा

Video: CSK ची प्रॅक्टिस पाहायला आलेला प्रेक्षक डॅरिल मिचेलच्या शॉटने जखमी, आयफोनही तुटला; त्यानंतर काय झालं पाहा

Latest Marathi News Live Update: नरेंद्र मोदी अन् भाजपचा फोकस कोणत्याही किंमतीवर सत्ता मिळवण्यावर - सोनिया गांधी

Ajit Pawar: सोशल मीडिया त्याला चांगला जमतो; लहानपणापासूनच नौटंकी...; Viral Videoवरून अजितदादांचा रोहित पवारांवर निशाणा

Subodh Bhave : सुबोधचं बायकोला गोड सरप्राईज; सोशल मीडियावर होतंय कौतुक

SCROLL FOR NEXT