NCP-Rupali-Chakankar-Mangalwedha 
पश्चिम महाराष्ट्र

मुलींच्या जीवाशी खेळणाऱ्या सरकारवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा

सकाळ वृत्तसेवा

मंगळवेढा : कोपर्डीसारख्या घटनांची संख्या महाराष्ट्रामध्ये वाढत आहेत; परंतु राज्याचे गृहखाते मात्र काहीच कारवाई करत नसल्यामुळे 32 हजार मुलींनी जीव दिला. आमच्यावर कोणताही डाग नसल्याचे हे सरकार सांगत असून मुलींच्या जीवाशी खेळणाऱ्या सरकारवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा.  गृहखाते स्वत:कडे ठेवलेल्या मुख्यमंत्र्यांनी तत्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी व्यक्त केली.       

तालुक्यातील डोणज येथील शाळकरी मुलीवर बलात्कार झाल्याप्रकरणी त्या पीडित मुलीच्या विचारपूस करण्यासाठी मंगळवेढा दौऱ्यावर आल्या होत्या. पोलिस निरीक्षक अनिल गाडे यांनी केलेल्या तपासाची माहिती घेतल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी जिल्हाध्यक्षा अनिता नागणे, जयमाला गायकवाड, सुवर्णा बागल, पूजा मोरे, विनायक नागणे, संदीप बुरकूल उपस्थित होते.

चाकणकर पुढे म्हणाल्या की, राज्यात 16 हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून मुख्यमंत्री म्हणतात की, आमच्या सरकारवर कोणताही डाग नाही. हा डाग निष्काळजी सरकारचाच आहे. बलात्कारानंतर शरीरावर होणाऱ्या जखमा भरून येतात, पण मनावर झालेली जखम भरून येत नाही. घराच्या बाहेर पडलेली मुलगी घरात परत येईल, याची काळजी घरच्यांना लागून राहते.

राम कदम, गिरीश महाजन, प्रशांत परिचारक या भाजपच्या नेत्यांनी देशाच्या सीमेवर संरक्षण करणाऱ्या सैनिकांच्या पत्नींबाबत अपशब्द वापरले होते. गिरीश महाजन हे पोलिस फौजफाटा घेऊन फिरत असतात. त्यांना काळे झेंडे दाखविलेल्या महिलांना आपल्या अधिकारांचा वापर करत अटक केली होती. पोलिसांच्या मदतीविना फिरून दाखवा, महिलांची ताकद काय आहे? हे तुम्हाला दाखवून देऊ.

उभ्या महाराष्ट्राच्या विकासासाठी आपली हयात घालविणाऱ्या पवार साहेबांचा शिखर बँकेच्या प्रकरणात कसलाही सहभाग नाही, असे सांगितले. तरीही ईडी माध्यमातून राष्ट्रवादीवर दबाव टाकण्याचा प्रयत्न सरकार करत असून राष्ट्रवादी महिला काँग्रेस ईडी कार्यालयावर व अधिकाऱ्यांच्या घरासमोर निदर्शने करणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाचा Mumbai Indians ला फटका; सर्व सघांची झाली एक लढत, मोठी उलथापालथ

Supreme Court : अनावश्यक खटले टाळा! अधिकाऱ्याच्या बडतर्फीला आव्हान देणाऱ्या केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टानं फटकारलं, ठोठावला दंड

Pune BJP News: पुणे महापालिका स्वीकृत नगरसेवकांना थेट पाच वर्षांची मुदत; अडीच वर्षांच्या आशेवर पाणी, अनेक कार्यकर्त्यांचा पत्ता कट

Countries with most uranium: अणुऊर्जेसाठी लागणारं युरेनियम कोणत्या देशाकडे सर्वाधिक आहे? भारत, पाकिस्तान कितव्या क्रमांकावर?

Kidney Transplant : मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी १९७० रुग्ण प्रतीक्षेत; पुणे विभागातील १४०० पुरुषांसह ५७० महिलांचाही समावेश

SCROLL FOR NEXT