five dead in accident at sangli jhare 
पश्चिम महाराष्ट्र

Video : परत एकदा गाडी विहीरीत : 5 जणांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

झरे (जि. सांगली) - नातलगाच्या अंत्यविधीसाठी जातानाच पाच जणांवर काळाने घाला घातला आहे. गाडीची स्टेरिंग लॉक झाल्याने गाडी रस्त्यालगतच्या विहिरीमध्ये पडली व यात 5 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. कुंडलीक बरकडे, गुंडा डोंबाळे (वय 35), संगीता पाटील (40), शोभा पाटील (38) अशी अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत तर हरिबा वाघमोडे हे जखमी असून त्यांना रूग्णालयात दाखल केले आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी...

मृत आणि जखमी आपल्या नातेवाईकाच्या अंत्यविधीसाठी जात असताना पारेकर वाडीपासून झरेकडे येणाऱ्या रस्त्याला पारेकर वाडी पासून अर्ध्या किलोमीटरवर गाडीची स्टेरिंग लॉक झाल्याने चालकाचा ताबा सुटला आणि गाडी रस्त्यालगतच्या विहिरीमध्ये पडली. विहिलीला पाणी प्रचंड असल्याने सर्वांना गाडीतून बाहेर पडता आले नाही. परुंतु, वाघमोडे गाडीची काच फोडून बाहेर पडले व पोहोत विहिरीच्या काटाला आले. गाडीतील उर्वरीत पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. तर वाघमोडे जखमी झाले. अपघातग्रस्त गाडी जेसीबीच्या साह्याने बाहेर काढण्यात आली आहे. 

घटनेची माहीती समजताच झरे पारेकरवाडी या परिसरातील लोकांनी मदतीसाठी धाव घेतली. घटनास्थळी पोलिस पाटील विक्रम पाटील, माजी समाज कल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर यांनी धाव घेतली व जखमीला तातडीने उपचारासाठी रूग्णालायात दाखल केले. 

रस्यागलगत विहिर पाडण्यास परवानगी कशी? 
रस्त्यालगतच पाच फुटावरती विहीर आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यालगत पाच फुटावर विहिर पाडायला परवानगी दिली कशी? असा प्रश्न घटनास्थळावरील लोक विचारत होते. शिवाय याची चौकशी व्हावी अशी ग्रामस्थांकडून मागणी होत आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : 'कुराश' खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट राज्यभर पसरलेले; एक हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रे वाटली

Bribe Case : कारवाई न करण्यासाठी पाच लाखांची लाच घेताना पोलीस कर्मचारी जाळ्यात

Ganesh Utsav 2026: महाराष्ट्रापासून मिझोरमपर्यंत! कशी साजरी होते गणेश चतुर्थी? जाणून घ्या वेगवेगळ्या राज्यांतील अनोख्या परंपरा!

बायकोचं शीर कापून फ्रीजमध्ये ठेवलं! जेलमधून सुटल्यानंतर पत्नीच्या 'शुगर डॅडी'ला ठार मारण्याची धमकी

Pune News : भाजपमधील धुसफूशीचा मोहोळांच्या उपस्थितीत सोक्षमोक्ष? आज नगरसेवकांची होणार बैठक

SCROLL FOR NEXT