Sugar Season esakal
पश्चिम महाराष्ट्र

Sugar Factory : साखर उत्पादन वाढले तब्बल पाच लाख टनांनी; उताऱ्यात यावर्षीही कोल्हापूर विभागाची आघाडी

गेल्यावर्षीच्या साखर हंगामाच्या (Sugar Season) तुलनेत यावर्षी साखर उत्पादनात पाच लाख टनाची वाढ झाली.

सकाळ डिजिटल टीम

राज्यात यावर्षी २०७ साखर कारखान्यांनी हंगाम घेतला. यापैकी १०३ सहकारी, तर १०४ खासगी कारखान्यांचा समावेश होता.

कोल्हापूर : गेल्यावर्षीच्या साखर हंगामाच्या (Sugar Season) तुलनेत यावर्षी साखर उत्पादनात पाच लाख टनाची वाढ झाली असून, सरासरी साखर उतारा मात्र घटला आहे. राज्यातील साखर हंगामाची अधिकृत सांगता बुधवार (ता. १५) झाली. त्यानंतर साखर आयुक्त कार्यालयाकडून (Sugar Commissioner Office) ही माहिती जाहीर करण्यात आली.

दरम्यान, यावर्षीच्या हंगामात वाढलेले उसाचे उत्पादन, लांबलेला हंगाम यामुळे गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षीचा साखर हंगाम महिनाभर लांबला होता. आता साखर विक्री करून अंतिम टप्प्यात तुटलेल्या उसाचे बिल देण्याचे आव्हान साखर कारखान्यांसमोर आहे. राज्यात साखर उताऱ्यात यावर्षीही कोल्हापूर विभागाने आघाडी घेतली आहे. कोल्हापूर विभागाचा (Kolhapur Division) सरासरी साखर उतारा ११.५९ आहे.

राज्यात यावर्षी २०७ साखर कारखान्यांनी हंगाम घेतला. यापैकी १०३ सहकारी, तर १०४ खासगी कारखान्यांचा समावेश होता. गेल्या हंगामात २११ कारखान्यांनी हंगाम घेतला होता, त्यात १०६ सहकारी व १०४ खासगी कारखान्यांचा समावेश होता. राज्यातील साखर हंगामाची अधिकृत सांगता १५ मे रोजी झाली असली तरी कोल्हापुरातील हंगाम ५ एप्रिल रोजीच संपला. सर्वात शेवटी कुंभी-कासारी कारखान्याचा हंगाम संपला. जिल्ह्यात १६ सहकारी व सात खासगी कारखान्यांनी मिळवून १५३ लाख २१ हजार ५६४ टन ऊस गाळप करून १८० लाख २२ हजार ३९ क्विंटल साखर उत्पादन केले आहे.

जिल्ह्यात सर्वाधिक १२.९९ साखर उतारा दालमिया शुगर्सने घेतला आहे. हंगामाच्या सुरुवातीला एफआरपीपेक्षा प्रतिटन २०० रुपये जास्त मिळावेत, या मागणीसाठी शेतकरी संघटनांना आंदोलन पुकारले होते. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पुकारलेल्या या आंदोलनात संघटनांनी आक्रमक भूमिका घेऊन नियोजित वेळेत हंगाम सुरू होऊ दिला नाही. त्यामुळे तब्बल महिनाभर उशिरा हंगाम सुरू झाला.

यावर्षी उसाखालील लागवडीचे क्षेत्र अधिक असल्याने हंगाम वेळेत सुरू व्हावा, अशी कारखानदारांसह उत्पादकांचीही मागणी होती. पण, हंगाम लांबल्याचा फटकाही शेतकऱ्यांना बसला. एक-दोन वेळ झालेला अवकाळी पाऊस वगळता पावसाने पाठ फिरवल्याने अंतिम टप्प्यातील उसाला पाणी मिळाले नाही. त्याचा परिणाम साखर उताऱ्यावर झाला. महाराष्ट्राच्या तुलनेत अन्य राज्यात हंगाम लवकर सुरू झाला. त्यातून तोडणी कर्मचारी अशा राज्यात गेल्याने त्याचाही परिणाम हंगामावर झाला.

दृष्टिक्षेपात राज्यातील साखर हंगाम

  • तपशील २०२३-२४ २०२२-२३

  • एकूण गाळप १०५५ लाख मे. टन १०७३ लाख मे. टन

  • साखर उत्पादन ११० लाख मे. टन १०५ लाख मे. टन

  • सरासरी उतारा १०.२७ टक्के ९.९८ टक्के

  • हंगाम घेतलेले कारखाने २०७ २११

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UP Dog Life Imprisonment : ऐकावं ते नवलच! आता उत्तर प्रदेशात कुत्र्यालाही होणार जन्मठेप; योगी सरकारचा नवा निर्णय

Double Decker Bus: पुणेकरांची स्वप्नपूर्ती! 'मनपा'च्या ताफ्यात डबल डेकर बस; 'या' मार्गांवर धावणार

Thane Traffic: घोडबंदर मार्गावर दिवसा 'या' वाहनांना नो एन्ट्री, एकनाथ शिंदे यांचे निर्देश जारी

OCD Explained: OCD म्हणजे फक्त स्वच्छतेशी संबंधित नाही! डॉक्टरांनी सांगितले ऑब्सेसिव्ह कंपलसिव्ह डिसॉर्डरचे खरे स्वरूप

Kannad News : चिकलठाणच्या गांधारी नदीच्या पुराच्या पाण्यात वाहून शेतकऱ्याचा मृत्यू; कन्नड तालुक्यातील घटना

SCROLL FOR NEXT