पश्चिम महाराष्ट्र

Video : मंत्र्यांच्या समाेरच त्याने केला पत्नीला व्हिडीओ कॉल अन्...

सकाळ वृत्तसेवा

इस्लामपूर (ता. वाळवा, जिल्हा सांगली) : येथील रेठरे हरणाक्ष गावच्या हसन हकीम या तरुणाला बोलता येत नाही. मागील वर्षी आलेल्या पूरात संपूर्ण घरदार उद्ध्वस्त झाले आहे. घरी आई आणि पत्नी असते. जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्याकडे आपल्या समस्येचे हमखास निवारण होईल या आपेक्षेने हा तरुण जयंत पाटील यांना भेटण्यासाठी आला; मात्र त्याला आपल्या समस्या मंत्र्यांकडे मांडताच येईना.

मग तरुणाने शक्कल लढवत जयंत पाटील यांच्यासमोरच पत्नीला व्हिडीओ कॉल लावला. जयंत पाटील यांनीही फोनवर काही प्रश्न विचारत समस्या जाणून घेतली आणि उपस्थित अधिकाऱ्यांना समस्येची सोडवणूक करण्याचे तत्काळ आदेश दिले.

या कुटुंबाने मंत्र्यांकडे मागतली थेट मदत

मागील वर्षी झालेल्या महाप्रलयंकारी पूरात अनेक घरांची पडझड झाली. अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाले. त्यापैकीच एक हकीम कुटुंबीय. या कुटुंबाला राज्य सरकारची ९५ हजारची मदत तर झाली; मात्र केंद्राकडून येणारी मदत अद्यापही प्रलंबित आहे. मदत अपुरी असल्याने हसन हकीम आणि त्यांच्या पत्नीने यांनी थेट जयंत पाटील यांच्याकडे दाद मागितली.

जयंत पाटील यांनी या कुटुंबाचा प्रश्न समजून घेत सोबत असलेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना संबंधित कुटुंबाचे नाव लिहून घेण्यास सांगत तात्काळ समस्येची सोडवणूक करण्याचे आदेश दिले. प्रांताधिकारी नागेश पाटील, गटविकास अधिकारी शशिकांत शिंदे, तहसीलदार रविंद्र सबनीस उपस्थित होते.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: मुंबईकरांसाठी बीएमसीची दिवाळी भेट! ४२६ सदनिकांच्या विक्री प्रक्रियेला सुरूवात होणार? अर्ज कधी आणि कुठे करायचा?

Electric car caught fire Video : भररस्त्यात पेटली इलेक्ट्रिक SUV कार; दरवाजे झाले लॉक अन् ड्रायव्हर जिवंत जळाला!

सायन रुग्णालयात नोव्हेंबरपासून बोन मॅरो प्रत्यारोपणासाठी विस्तारित केंद्र सुरू, प्रत्यारोपण क्षमता वाढणार

Supreme Court: पत्नीने नवऱ्याला भोवऱ्यासारखा फिरवू नये, घरात भांडण होत असतील तर... सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय काय?

Silver Price: चांदीच्या किंमती एवढ्या का वाढल्या? कारणं कोणती? भविष्याबाबत तज्ज्ञ काय सांगतात?

SCROLL FOR NEXT