पश्चिम महाराष्ट्र

पूरग्रस्त भागातील वीजबिल वसुलीला स्थगिती; ऊर्जामंत्र्यांची घोषणा

पूरग्रस्त भागातील परिस्थिती भयावह असली, तरी संपूर्ण वीज बिल माफ करणे शक्य नाही

घनश्याम नवाथे : सकाळ वृत्तसेवा

सांगली : पूरग्रस्त भागातील (sangli flood) परिस्थिती भयावह असून संपूर्ण वीज बिल माफ (electricity bill) करणे शक्य नाही, मात्र राज्यातील पूरग्रस्त भागातील वीज बिल वसुलीला स्थगिती देण्यात आल्याची घोषणा ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत (nitin raut) यांनी येथे केली.

ते म्हणाले, ‘‘यंदाच्या महापुरात राज्यातील कोकण (konkan) आणि पश्‍चिम महाराष्ट्रातील (paschim maharashtra) जिल्ह्यात घरे, शेती आणि महावितरणच्या उपकेंद्रांचे मोठे नुकसान झाले आहे. लोकांसाठी वीज महत्त्वाची आहे, परंतू वीज मोफत तयार होत नाही. कोळसा आणि ऑईल विकत घेतल्यानंतर वीजनिर्मिती होते. कर्मचाऱ्यांचा पगार वेळेवर द्यावा लागतो. मागील सरकारने वीज कंपन्यांवर 56 हजार कोटींचे कर्ज करून ठेवले आहे. त्यामुळे मला 70 हजार कोटी रुपयांचे कर्ज घेण्याची वेळ आली आहे. या कर्जाच्या नोटिसा आल्या आहेत. सध्या पूरग्रस्त भागातील परिस्थिती भयावह असली, तरी संपूर्ण वीज बिल माफ करणे शक्य नाही. त्यामुळे पूरग्रस्तांना दिलासा देण्यासाठी वीजबिल वसुलीला स्थगिती देत आहे. पूरग्रस्त भागात वीजबिले वाटप आणि सक्तीची वसुली थांबवण्याचे आदेश दिले जातील.’’

राऊत पुढे म्हणाले, ‘‘राज्यात कोकणात 22 जुलैला अतिवृष्टी झाली. पश्चिम महाराष्ट्रात 48 तासात पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली होती. सांगली जिल्ह्यात 23 जुलैपासून अतिवृष्टी आणि धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे नद्यांची पातळी वाढली. सांगलीत पाणी 55 फुटांवर पोचले होते. जिल्ह्यात सांगली, मिरजेसह शिराळा, वाळवा व पलूस तालुक्यांना महापुराचा फटका बसला. उपकेंद्रे, ट्रान्सफार्मर, वाहिन्या, खांब आदींचे 35 कोटी रूपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

महापूर पूर्ण ओसरल्यानंतर नुकसानीचा आकडा वाढेल. राज्यातील 170 पूरग्रस्त गावातील नऊ लाख ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता. त्यापैकी 7 लाख 67 हजार ग्राहकांचा वीज पुरवठा सुरु करण्यात आला. पूरग्रस्त गावातील दुरुस्तीचे काम अद्याप सुरू आहे. ज्या गावांचा वीज पुरवठा खंडित आहे, तो पूर्ववत करण्याचा प्रयत्न महावितरणच्या कर्मचाऱ्यांकडून सुरू आहे. ’’ यावेळी कृषी व सहकार राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, आमदार विक्रम सावंत, जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी, महावितरणचे अधीक्षक अभियंता धर्मराज पेटकर, पृथ्वीराज पाटील आदी यावेळी उपस्थित होते.

ट्रान्सफार्मर्सची उंची वाढवणार

डॉ. राऊत म्हणाले, '2019 ला आलेली महापुराची पाण्याची पातळी गृहीत धरून त्यानुसार उपकेंद्र, ट्रान्सफार्मरची उंची वाढवण्याबाबतचा विचार असून त्याचा आराखडा तयार करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : मराठी माणसासाठी शेवटची निवडणूक, मुंबईसाठी एक व्हा; राज ठाकरेंचं आवाहन

IND vs NZ, 1st ODI: विराट कोहलीचं शतक हुकलं, पण भारतानं मैदान जिंकलं! रोमांचक सामन्यात न्यूझीलंडचा पराभव

Bigg Boss Marathi 6 Live Update: लोकप्रिय इन्फ्लुएन्सर अनुश्री मानेची 'बिग बॉस मराठी ६' मध्ये एंट्री

सोशल मीडिया स्टार करण सोनवणेची बिग बॉस मराठी 6 मध्ये धमाकेदार एंट्री, सोनवणे वहिनी घरात राडा घालणार?

Bigg Boss Marathi 6 : बॅकग्राऊंड डान्सर म्हणून स्ट्रगल, मालिकांमधून प्रसिद्धी आता बिग बॉसमध्ये राडा करायला आला आयुष संजीव !

SCROLL FOR NEXT