Vijay Tad
Vijay Tad sakal
पश्चिम महाराष्ट्र

Jat Crime : जतमध्ये माजी नगरसेवकाचा गोळीबारासह दगडाने ठेचून खून

सकाळ वृत्तसेवा

जत येथील नगरपालिकेचे माजी नगरसेवक विजय शिवाजीराव ताड (वय 40) यांच्यावर शुक्रवारी दुपारी दोनच्या सुमारास अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार करून, तसेच दगडाने ठेचून निर्घृण खून करण्यात आला.

जत - जत येथील नगरपालिकेचे माजी नगरसेवक विजय शिवाजीराव ताड (वय 40) यांच्यावर शुक्रवारी दुपारी दोनच्या सुमारास अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार करून, तसेच दगडाने ठेचून निर्घृण खून करण्यात आला. या घटनेमुळे शहरासह तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. ही घटना जत शेगाव रोडवरील अल्फॉन्सा स्कूल जवळ घडली.

नगरसेवक ताड हे ज्येष्ठ नेते स्वर्गीय शिवाजीराव ताड यांचे सूपुत्र होते. शुक्रवारी दुपारी दोनच्या सुमारास आपल्या घरापासून काही अंतरावर असणाऱ्या अल्फोंसा स्कूल येथे मुलांना घेऊन येण्यासाठी जात असताना, त्यांच्या इनोवा गाडीवर हल्लेखोरानी प्रथम गोळीबार केला. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे ते गाडीतून पळत जात असताना, त्यांचा पाठलाग करून पुन्हा गोळीबार करत त्यांच्या डोक्यात दगड घालून खून करण्यात आला आहे.

या घटनेनंतर हल्लेखोर पसार झाले आहेत. ही माहिती मिळताच जत शहर व तालुक्यात मोठी खळबळ उडाली. शहरात यामुळे प्रचंड तणाव निर्माण झाला असून पोलिसांनी सर्वत्र चोख बंदोबस्त ठेवला आहे. घटनास्थळी बंदुकीतील काही पुंगल्या ही आढळून आल्या आहेत. हल्ल्याचे कारण मात्र नेमके समजू शकले नाही. जत पोलीस या घटनेचा गतीने तपास करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

SRH vs RR Live IPL 2024 : दोन धक्क्यानंतर यशस्वी, रियाननं डाव सावरला; राजस्थान 10 षटकात शतक पार

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

Rohit Sharma Rinku Singh : पत्रकार परिषदेनंतर रोहित रिंकूला भेटला; केकेआरनं केलं ट्विट

SCROLL FOR NEXT