fraud with farmers in belgaum rupees 2 crore fraud arrest by police 
पश्चिम महाराष्ट्र

गावठी कोंबडीची पिल्ली देतो म्हणत शेतकऱ्यांची केली फसवणूक

सकाळ वृत्तसेवा

बेळगाव : गावठी कोंबडीची पिले देतो, असे सांगून शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या एकाला माळमारुती पोलिसांनी सोमवारी (ता. ८) अटक केली. हरीश एम. कोट्टूर (वय २५, रा. आंजनेयनगर, बेळगाव) असे संशयिताचे नाव आहे. त्याने बेळगावसह परराज्यातील शेतकऱ्यांना जवळपास दोन कोटी रुपयांचा गंडा घातल्याचा संशय आहे. अशोक एम. जी. (रा. अनंतपुरम) यांच्या फिर्यादीवरुन ही कारवाई करण्यात आली.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, हरिषने आंजनेयनगरात एचजीके ऑरगॅनिक ॲग्रो प्रायव्हेट लिमिटेड या नावाने व्यवसाय सुरु केला होता. आपल्याकडे गावठी कोंबडीची पिल्ले मिळतील अशी जाहिरात त्याने फेसबुकवर केली होती. त्याला भुलून फिर्यादीने त्याच्याशी संपर्क साधला. त्यावेळी हरीशने कोंबडीची पिल्ले प्रत्येकी ३० रुपयाला मिळतील असे सांगितले.

फिर्यादीने दहा हजार पिल्ले हवी असल्याचे सांगितल्यानंतर हरिषने त्यांना ३ लाख रुपये देण्यास सांगितले. आगाऊ रक्‍कम म्हणून दीड लाख रुपयांची मागणी केली. मात्र, फिर्यादीने पहिल्यांदा ५० हजार रुपये देतो व पिल्ले मिळाल्यानंतर सर्व रक्कम दिली जाईल, असे सांगितले. त्यानुसार १७ जुलै २०२० रोजी ४० हजार व दुसरे दिवशी १० हजार असे एकूण ५० हजार रुपये त्यांनी संशयिताच्या बॅंक खात्यावर जमा केले.

मात्र, पैसे भरुन बरेच दिवस उलटले तरी संशयिताने कोंबडीची पिल्ले दिली नाहीत. त्यांनी त्याच्याशी वारंवार संपर्क साधला. पण, संशयिताने प्रतिसाद दिला नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच अशोक यांनी सोमवारी माळमारुती पोलीस स्थानकात फिर्याद नोंदवली. पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांनी तातडीने गुन्हा दाखल करुन घेत संशयित हरिषला अटक केली. जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करुन त्याची कारागृहात रवानगी करण्यात आली. संशयिताने बेळगावसह कर्नाटक, महाराष्ट्र व अन्य राज्यातील हजारो शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा संशय पोलिसांना आहे. त्याने सुमारे दोन कोटी रुपयांचा गंडा घातल्याचा अंदाज आहे.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray UPI : युपीआयवरील MDR म्हणजे ‘डिजिटल सापळा’; राज ठाकरेंचा केंद्र सरकारवर हल्लाबोल, व्यापाऱ्यांना शुल्क न भरण्याचं आवाहन

पदराने अचानक पेट घेतला, केसांपर्यंत आग गेली! जुई गडकरीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग, म्हणाली...'पाठीला जोरात चटका बसला अन्...'

कौटुंबिक वाद विकोपाला! भांडणात पतीच्या गुप्तांगाला चावा घेतला, संतापलेल्या पतीने पत्नीचं थेट नाक कापलं; घटनेने खळबळ

Iran Execution : इराणने मोसादच्या गुप्तहेराला दिली फाशी, इस्त्रायलला संवेदनशील लष्करी माहिती पुरवल्याचा आरोप

Mumbai: लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी रांगेत थांबलेल्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू; जळगावच्या जयदीप नेमाडे यांचा दुर्दैवी अंत

SCROLL FOR NEXT