Fraud by on WhatsApp 
पश्चिम महाराष्ट्र

व्हॉट्‌सऍपवर ठरलं अन्‌ लाखोंना गंडवलं 

सूर्यकांत वरकड

नगर : ऑनलाइन संकेतस्थळावर लग्नाचे आमिष दाखवून सारोळे (ता. जामखेड) येथील एका  तरुणाला एक लाख 65 हजारांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत सायबर पोलिस ठाण्यात एका तरुणीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.  रेखा नीलेश कदम (रा. आकृती बिल्डिंग, मार्केटजवळ, वाशी, नवी मुंबई) या व्यक्तीने ही फसवणूक केली. 

याबाबत हनुमान मोहनराव काळे (रा. सारोळे, ता. जामखेड) यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की लग्नासाठी जीवनसाथी वेबसाइटवर संपर्क करून बायोडाटा अपलोड केला. त्यानंतर काही दिवसांत अनेक मुलींची नावे त्यावर दिसली. त्यातील रेखा कदम नावाच्या मुलीला रिक्वेस्ट पाठविली. तिने ती स्वीकारली. त्यानंतर "व्हॉट्‌सऍप चॅटिंग' सुरू झाले. 

सुरवातीच्या काळात कौटुंबिक माहितीची देवाण-घेवाण झाली. उद्योग-व्यवसायाबाबतही चौकशी झाली. तिने आई-वडील मुंबई राहत असल्याचे सांगितले आणि सध्या सिंगापूर येथे शूटिंगसाठी आल्याचे सांगितले. मात्र, बॅंकिंगचा प्रॉब्लेम झाल्यानंतर पैशाची अडचण असल्याचे सांगून सुरवातीला तिने तीन हजार रुपये मागितले. काळे यांनी तत्काळ तिच्या खात्यावर पैसे भरले. त्यानंतर हळूहळू शॉपिंगसाठी आणि काही वस्तूंच्या खरेदीसाठीही तिने पैसे मागितले. 

सिंगापूर येथून दिल्लीला आल्यानंतर, मुंबईला जाण्यासाठी पैसे कमी पडल्याचा बहाणा तिने केला आणि पुन्हा चार हजार रुपये मागितले. काळे यांनी तिच्या खात्यावर पुन्हा पैसे टाकले. तिने भेटण्यासाठी मुंबई येथे बोलाविल्यानंतर काळे जामखेड येथून मुंबईला गेले. तेथे गेल्यानंतर तिने जो पत्ता सांगितला होता, त्याची शोधाशोध केली; पण ती सापडली नाही. आई-वडील आजारी असल्याने रत्नागिरीला आल्याचे तिने सांगितले. तिने डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात लग्न करण्याची शपथ काळे यांना दिली होती. 

डिसेंबर उजाडल्यानंतरही ती उडवाउडवीची उत्तरे देत असल्याने, तिला आतापर्यंत दिलेले पैसे काळे यांनी परत मागितले. मात्र, पैसे देण्यास तिने आढेवेढे घेण्यास सुरवात केली. सध्या चांगला जॉब नाही. जॉब लागल्यानंतर पैसे देते, असे म्हणून वेळ मारून नेण्यास सुरवात केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर काळे यांनी सायबर पोलिस ठाणे गाठले, अशी माहिती पोलिस सूत्रांकडून समजली. पोलिस निरीक्षक अरुण परदेशी तपास करीत आहेत. 

ती व्यक्ती नेमकी कोण? 
लग्नाच्या आणाभाका केवळ "व्हॉट्‌सऍप' ठरल्या. हनुमान काळे तिच्याशी कधीच फोन अथवा प्रत्यक्ष बोलले नाही. केवळ "व्हॉट्‌सऍप'वरून चॅटिंग होत होते. त्यामुळे समोरची व्यक्ती महिला की पुरुष, असा प्रश्‍न पोलिसांना पडला आहे. पोलिस सध्या तांत्रिक तपासाआधारे संबंधित व्यक्तीचा शोध घेत आहेत. 
 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: 5/84 ते 5/385! हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ यांच्या १५० धावा; १४८ वर्षांच्या इतिहासात जे कधीच घडले नव्हते ते इंग्लंडने केले

Saif Ali Khan : सैफ अली खानला मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने दिला मोठा धक्का!

Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला चीनची सक्रिय मदत; लष्कर उपप्रमुखांची माहिती

WI vs AUS: ६ पावलं पळाला, स्वतःला दिलं झोकून; Pat Cummins चा अविश्वसनीय झेल, Viral Video नक्की पाहा

Miraj News : कौटुंबिक वादातून कीटकनाशक पिवून पिता पुत्राने संपविले जीवन

SCROLL FOR NEXT