पश्चिम महाराष्ट्र

तेलंगवाडी शिवारात व्यापाऱ्यास लुटले 

सकाळ वृत्तसेवा

मोहोळ(जि. सोलापूर) ः एका व्यापाऱ्याच्या बोलेरो जीपला दुचाकी आडवी लावून त्याच्याजवळील 80 हजार रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना मंगळवारी (ता. 14) दुपारी साडेचार वाजता सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील तेलंगवाडी शिवारात घडली. दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेमुळे परिसरात घबराट पसरली आहे. सौदागर समाधान भांगे (वय 30, रा. शेटफळ) अशी लूट झालेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे. 

मोहोळ पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सौदागर भांगे हे शेतीसह डाळिंबाचा व्यापार करतात. शेतकऱ्याकडून डाळिंब खरेदी करून ते बाजारपेठेत विकतात. त्यांनी डाळिंब विक्रीतून आलेली रक्कम शेतकऱ्यांना देण्यासाठी दुपारी अडीच वाजता कोटक महिंद्रा बॅंकेतून 50 हजार रुपये काढले तसेच मोडनिंब येथे जाऊन युनियन बॅंकेच्या एटीएममधून 30 हजार रुपये काढले. दोन्ही मिळून 80 हजारांची रक्कम पोखरापूर येथील शेतकऱ्यांना देण्याकरता ते बोलेरो गाडी (एमएच 15-डीएस 9486) मधून पोखरापूरकडे निघाले होते. त्यांची गाडी तेलंगवाडी शिवारात आली तेव्हा शाईन दुचाकी (एमएच 11-सीव्ही 1594) वरून तिघेजण तरुण आले. त्यांनी बोलेरो गाडीला दुचाकी आडवी लावून भांगे यांना थांबण्यास भाग पाडले.

गाडी थांबताच एकाने त्यांना धरून ठेवले तर दुसऱ्याने गाडीची चावी काढून फेकून दिली व गाडीत ठेवलेली 80 हजारांची रक्कम घेऊन पोबारा केला. या घटनेची फिर्याद सौदागर भांगे यांनी मोहोळ पोलिसांत दिली आहे. पोलिस उपनिरीक्षक संतोष इंगळे व पोलिस नाईक पवार तपास करीत आहेत. 

महाराष्ट्र

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime: भावजयचे दिरासोबत अनैतिक संबंध, जाऊबाई संतापली, भर पंचायतीत ॲसिडची बाटली आणली अन्...; धक्कादायक कृत्य

Latest Marathi News Live Update : तुळजापूरमध्ये पोलिस आणि भाविकांमध्ये वाद

मोठे अपडेट्स : IPL मध्ये १० नव्हे १२ संघांमध्ये जेतेपदाची स्पर्धा रंगणार? BCCI चा मास्टर प्लान, शंभरच्या आसपास लढती होणार...

'दारु प्यायचो, मासांहार करायचो, दिवसाला 200 सिगारेट ओढायचो' अमिताभ बच्चन यांनी केलेला खुलासा, म्हणालेले...'इतकी दारू प्यायचो की...'

2011 World Cup India Team: २०११ फायलनच्या भारताच्या प्लेइंग इलेव्हनमधील हिरो आत्ता काय करतात, दोन खेळाडू अद्यापही IPL खेळतात

SCROLL FOR NEXT